Wardha News : हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तीर्थक्षेत्र साकृर्ली येथे मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा तेथील नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य तरोडा येथील असल्याची माहितीही समोर आली आहे. बुधवारी (15 जून) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्माराम आणि कुंदा बोरकर असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. तरोडा येथील या दाम्पत्याच्या मुलाचं एक महिन्यांपूर्वीच लग्न झालं. त्यामुळे परंपरा आणि रितीरिवाजप्रमाणे देवीची पूजा-अर्चना करण्यासाठी हे पती-पत्नी नदीवर गेले होते. त्याचवेळी ही दुर्देवी घटना घडली.
आधी मंदिरात केली पूजा
आत्माराम आणि कुंदा बोरकर या दोघा पतीपत्नींनी आधी तीर्थक्षेत्र साकृर्ली येथील देवीमातेच्या मंदिरात पुजा केली. त्यानंतर दोघेही मंदिरामागे असलेल्या नदीत पुजा करण्यासाठी गेले असता पत्नी कुंदा यांचा पाय घसरून त्या नदीच्या पाण्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने त्या पाण्यात खोल बुडू लागल्या.पत्नीला पाण्यात बुडताना बघून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात पती आत्माराम बोरकर देखील नदीत बुडाले. नदीत असलेल्या खोल खड्ड्यात बुडून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे. घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह नदीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहेत.
हे देखील वाचा-
- Wardha : वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नव्या प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर; पाच गट आणि दहा गणांची वाढ
- Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज देऊळगाव मही मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा आज रिसोड येथे मुक्काम
- School First Day: पुणेकरांचा नाद नाय! हातात बॅग, बाजूला अब्दागिरी अन् लाडक्या लेकीनं केला थेट घोड्यावरुन शाळेत प्रवेश