Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले असता न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री 12.10 वाजता वाल्मिक कराड याला बीडकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आता नवंनविन माहिती पुढे येऊ लागली आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी नागपूर अधिवेशन सुरू होतं, त्यावेळी वाल्मिक कराड नागपूरलाच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Continues below advertisement

ज्यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्ये आरोपी करण्याची मागणी झाली, त्यावेळी  वाल्मिक कराड फरार झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तर सुरवातीला काही दिवस तो पुण्यात राहिला. तसेच साधारण आठ दिवसानंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेला असल्याची माहिती आहे. सुरवातीला गोवा ,कर्नाटक आणि इतर राज्यात त्यानंतर फिरला. सीआयडी सूत्रांच्या मते कराड बाबत ज्या महिलेची सीआयडीने चौकशी केली त्या महिलेकडे सुरवाचीचे काही दिवस सोबत असल्याचेही बोलले जात आहे. तर शरण आला त्यावेळी तो कोणत्या राज्यात होता याची खात्रीलायक माहिती जरी नसली तरी त्याला महाराष्ट्रात येण्यासाठी गाडीने दोन दिवस लागल्याची माहिती पुढे आली आहे.

चारही आरोपी गेवराई पोलीस कोठडीमध्ये

दरम्यान, वाल्मिक कराड यांना पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीनं केज कोर्टात हजर केले होते. वाल्मिक कराड आज सकाळी सीआयडीसमोर शरण आले होते. अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरु झाली होती.

Continues below advertisement

अखेर न्यायाधिशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी दिली आहे. अशातच सीआयडीच्या ताब्यात असलेल्या बीड शहर पोलीस स्टेशनमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चारही आरोपी गेवराई पोलीस कोठडीकडे हलवले आहे. मात्र वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्याआधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चारही आरोपी शहर पोलीस स्टेशन मधून हलवण्यात आले आणि त्यांना गेवराई पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा