Walmik Karad Son Sushil Karad: वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा मुलगा सुशील कराडवर (Sushil Karad) वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सोलापूर न्यायालयात दाखल असलेल्या खासगी फिर्यादीवर सुनावणी काल (20 जानेवारी) पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने काल निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार, सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा सुशील कराडवर आरोप आहे. सोलापूर न्यायालयात दाखल असलेल्या खासगी फिर्यादीवर काल सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दाखल करावे किंवा नाही या बाबतीत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय आज आदेश देणार आहे.
परळीतील प्लॉट व सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचाही आरोप-
सुशीलने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदूकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट व सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे व गोपी गंजेवार यांच्याविरुधातही ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या घरी लूट करताना हे दोघे त्याच्याबरोबर होते. दरम्यान, संबंधित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर पोलीस आयुक्त व बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
वाल्मिक कराडच्या नावावर पुण्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती-
वाल्मिक कराडचे पुण्यातील कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस दुसरी पत्नीच्या नावे आहेत. हा व्यवहार भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे. वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड याने दुसऱ्या पत्नीच्या नावे ऑफिस विकत घेतले आहेत. हडपसरमध्ये कोट्यावधी रूपये किमंतीच्या सदनिकाही कराड याने विकत घेतल्या आहेत. पिंपरी चिचंवडमध्येही कराड यांच्या कोट्यावधी रूपये किंमतीच्या सदनिका आहेत.