Virar News विरार : विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात आयोजित 'वचनपूर्ती जल उत्सव' या कार्यक्रमादरम्यान राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ (Virar Crime News) उडाला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संपूर्ण रस्त्यावर कब्जाकरून कार्यक्रम घेतल्याचा आरोप (Crime News) होत असतानाच, स्थानिकांनी विरोध केला. या विरोधानंतर परिस्थिती आणखी चिघळली, कारण एका महिला युट्यूबरसोबत (YouTuber) जय श्रीरामच्या घोषणांसह अश्लील वर्तन आणि धक्काबुकी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Continues below advertisement

Virar Crime News : 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ग्लोबल सिटी परिसरात 'वचनपूर्ती जल उत्सव' आयोजित करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण रस्ता व्यापून हा कार्यक्रम घेण्यात आल्याने स्थानिक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली. याच दरम्यान एका महिला युट्यूबर पत्रकाराशी एकाने जय श्रीरामच्या घोषणा देत अश्लील वर्तन करत धक्काबुकी केली, असा गंभीर आरोप करण्यात आला. त्या युट्यूबर तरुणीच्या तक्रारीवरून बोळींज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील स्थानिकांनी केलेल्या गोंधळाबाबत पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करत 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केल्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर संतप्त झाले. ते रात्रीच बोळींज पोलीस ठाण्यात पोहोचले आणि आपल्या स्थानिकांची ही तक्रार स्वीकारावी, अशी मागणी डीसीपीकडे केली.

Chaos at Virar : प्रकरणामुळे रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण

दरम्यान, या प्रकरणामुळे रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांच्या भूमिकेवर विआने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पोलिसांनी त्वरीत आरोपीला अटक करण्याची मागणी पत्राकारार्फे केली जात आहे. पोलिसांनी मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमात नालासोपाराचे आमदार राजन नाईक, वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. घटनेनंतर बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले, ज्यामुळे काहीकाळ तणाव वाढला होता. कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे विरारमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. तर महिला पत्रकारासोबत घडलेल्या अपमानास्पद घटनेमुळे सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी महिलांवरील अशा वर्तनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Continues below advertisement

ही बातमी वाचा: