Vijaysinh Pandit on Laxman Hake : लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना काहीजण चावी देतात आणि चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी लक्ष्मण हाकेंवर केली आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा होता, त्याला मी पाठिंबा दिला. महायुती सरकारने कुणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतली, असेही आमदार विजयसिंह पंडित म्हणाले. आता राजकारण करण्याची वेळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक इथे राजकारण करत आहेत. पुन्हा तेच समाजात तेढ कसा निर्माण होईल. असा केविलवाणा प्रयत्न माझ्या भागात ते लोक करत आहेत. असं म्हणत त्यांनी नाव न घेता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
Vijaysinh Pandit on Laxman Hake : लक्ष्मण हाके चार्जिंगवर चालणारे बाहुले
माझ्या मतदार संघातील जनता सुज्ञ आहे. राज्य सरकार दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे लोक वारंवार येणार आहेत. लक्ष्मण हाके यांना काहीजण चावी देतात आणि ते चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे षडयंत्र आहे, त्यातून या गोष्टी केल्या जात आहेत. याला कोणीही थारा देणार नाही. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी आमची आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा होता, त्याला मी पाठिंबा दिला. मात्र महायुती सरकारने कुणालाही अडचण होणार नाही. याची काळजी घेतली. हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने मराठा समाजाला दिलासा दिला आणि तो लढा यशस्वी झाला. निवडणुकीसाठी मी हाके यांचे स्वागत करतो. पुढचे चार वर्ष त्यांनी टिकून रहाव. लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम आणि समाजात तेढ निर्माण करू नका. विकासाचे राजकारण करून टिकून रहा. असा सल्लाही आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी दिला आहे.
OBC Reservation Protest: 'भाजप आपलं OBC डीएनए विसरले का?', लक्ष्मण हाकेंचा फडणवीसांना सवाल
बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जीआरवरून (GR) भाजप (BJP) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'भारतीय जनता पार्टीने स्वतःला ओबीसींचा डीएनए म्हणून एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं आरक्षण संपविणारा जीआर काढायचा?', असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. हैदराबाद गझेटियर जीआरच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षण संपवल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. जर ओबीसी समाज एकत्र आला नाही, तर पुढच्या पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होईल, असा इशारा देतानाच, आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा एल्गारही हाके यांनी केला. या सभेत प्रस्थापित मराठा नेत्यांवरही टीका करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या