UPSC Interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या निकालात इशिता किशोर या विद्यार्थीनीने अव्वल स्थान पटकावले. इशिताने अव्वल स्थान पटकावल्यानंतर इंटरनेटवर तिचे नाव सर्च केले जात आहे. सोशल मीडियावर इशिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा तिचा मॉक इंटरव्यूह असून ज्यामध्ये ती सर्व कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जाताना दिसत आहे. तिने दिलेल्या उत्तरावर पॅनेलमधील सदस्यही सहमत असल्याचे दिसून येत आहे. या मॉक इंटरव्यूह व्हिडीओला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला UPSC ची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा, असा सल्लाही काही युजर्सने दिला आहे.
इशिताने व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे
जेव्हा UPSC टॉपर इशिता इंटरव्हू पॅनेल समोर बसते. तेव्हा तिने स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की तिने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला विचारले जाते की, तुम्ही तुमच्या शैक्षणिक कारकीर्दीत चांगले यश मिळवले. आता तुम्ही नागरी सेवेत आल्यानंतर ही कामगिरी कशी करणार, यात कसे यश मिळवणार? या प्रश्नालाही इशितानेही बेधडक आणि स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
UPSC टॉपर इशिता किशोर कोण आहे?
UPSC CSE 2022 (UPSC CSE 2022) परीक्षेत अव्वल ठरलेली इशिता किशोर ही श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राची पदवीधर आहे. त्यांच्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना होते. ती शाळेतही टॉपर राहिली आहे. तिच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने इशिताने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर कॉलेजचे नावही उंचावले आहे. कमेंट्सद्वारे अनेक लोक तिचे कौतुक करत आहेत. व्हिडीओ व्हायरल करून यूजर्स इशिता किशोरचे अभिनंदन करत आहेत.
असा पाहा निकाल
निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइट म्हणजे upsc.gov.in वर जा. येथे मुख्यपृष्ठावरील परीक्षा किंवा निकाल विभागात जा. त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर UPSC फायनल रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमची लॉगिन क्रेडेंशियल्स, उदा. रोल नंबर, नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रिझल्ट दर्शवला जाणारे पेज ओपन होईल.
ही बातमी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI