Uddhav Thackeray नाशिक : उद्धव ठाकरेंच्या नाशिक (Nashik) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: मैदानात उतरून नव्याने मोर्चेबांधणी करताना दिसताय. तर पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटी उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार

पुढे आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये शिवसेनेकडून 21 ते 27 जुलैपर्यंत जिल्हाभर विविध सामजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दौऱ्यात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. सोबतच जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांच्या स्वतंत्र बैठका देखील उद्धव ठाकरे हे स्वत: घेणार आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा अतिशय महत्वाचा  ठरणार आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आत्तापासून जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचे यातून दिसून आले आहे. मात्र नाशिकमध्ये  शिवसेनेतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला असताना ही गळती रोखण्यात आता उद्धव ठाकरे यांना कितपत यश येतं हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

माजी खासदार हेंमत गोडसें हे पक्षात नाराज, पुढील भूमिकेकडे लक्ष

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी खासदार हेंमत गोडसें हे पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. हेंमत गोडसें हे सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहे. पक्षाचे संघटनात्मक कामकाज आणि पक्षातील गटबाजीमुळे हेंमत गोडसें नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करणे आवश्यक असताना पक्ष पातळीवर सुसूत्रता नसल्याने हेंमत गोडसे  नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गोडसे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी अद्यापही दिली नसल्याने गोडसेंच्या गोटात अस्वस्थता आहे. संघटनात्मक रचनेच्या मुद्यावर नाराज असल्यानं हेंमत गोडसें पुढे काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या