नवी दिल्ली : इतिहासात प्रत्येक दिवसाचे आपले असे एक महत्त्व असते. इतिहासात घडून गेलेल्या काही घटनांचे पडसाद हे भविष्यावरही दिसून येते असतात. इतिहासातील काही घटना या दु:खद घटना म्हणूनही कायम कोरल्या जातात. आजच्या दिवशी, म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेत (Parliament Winter Session 2023) दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आज या घटनेला बावीस वर्ष पूर्ण होत आहे. विशेष बाब म्हणजे आजच्याच दिवशी दिल्लीतील संसदेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे आज परत देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला. त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने चौघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे 22 वर्षापूर्वी घडलेल्या संसेदवर दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहे.
संसदेत प्रेक्षक गॅलरीतून दोघांची उडी
संसदेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत एकच हल्लकल्लोळ माजला. संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान एका तरुणानं सभागृहात प्रवेश केला. लोकसभेत आज सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. दोन जणांनी संसदेत घुसखोरी केली. लोकसभा सुरू असताना दोन जण लोकसभेत घुसले. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी खाली लोकसभेत उड्या मारल्या. लोकसभेत त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल्स जाळल्या. दोघांना तातडीने मार्शल्सनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी या दोघांच्या घुसखोरीमुळे लोकसभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण होत असतानाच आज ही घुसखोरी झाल्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय. एकूण चार तरूण होते. दोघांनी लोकसभेत घुसखोरी केली. तर दोघांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं करत घोषणाबाजी केली. संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या दोघांमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाचा समावेश आहे. संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणारा आणि स्मोक कँडल जाळणाऱ्यात एका महिलेचा समावेश आहे. ही महिला हरयाणातल्या हिस्सारची रहिवासी आहे. तीन तरूणांपैकी एक जण लातूरचा अमोल धनराज शिंदे असल्याची माहिती समोर आलीय. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांनीही म्हैसूरच्या खासदारामार्फत पासेस बनवले होते, अशी माहिती उघड झाली आहे.
भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण
13 डिसेंबर 2001 हा भारतीय इतिहासातील काळा दिवस मानला जातो. याच दिवशी पाकिस्तानमधून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी लोकशाहीचे केंद्र असलेल्या भारतीय संसदेवर हल्ला केला होता. ही संसद आता संविधान सदन म्हणून ओळखले जाते. या दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचाऱ्यांसह 9 जण शहीद झाले होते. संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच अचानक गोळीबार होत असल्याचे आवाज येऊ लागले. दहशतवादी AK-47 रायफलसह एक पांढऱ्या रंगाची एंबेसडर कार मधून संसद भवनाच्या परिसरात घुसले होते. पांढऱ्या रंगाच्या कारमधील लष्करी गणवेश परिधान केला होता. गोळीबार सुरू झाल्यानंतर संसदेतील अलार्म वाजला. मुख्य इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद केले गेले. संसदेत सुरक्षिततेसाठी तैनात करणाऱ्यात आलेल्या जवानांनी चहूबाजूंनी दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास दोन्ही बाजूने गोळीबार केला गेला. त्यानंतर थोड्याच वेळात भारतीय जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला.