नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतील आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव राज्य मंत्रिमंडळाने फेटाळल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका तसाच कायम ठेवला आहे. आज दोन नगरसेवकांचे पद रद्द केल्यानंतर आता कामावर दांड्या मारणाऱ्या 125 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.


नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील वारंवार अनुउपस्थिती राहणाऱ्या आणि ठोक मानधनावर काम करणारे 59 वाहक आणि 66 चालकांना आयुक्तांनी नोकरीवरून काढून टाकले आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रक दर्जाचा एका अधिकारी आणि वाहकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

एनएमएमटीला लागलेली उतरती कळा रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारंवार गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

याआधीदेखील एनएमएमटीमधील 24 कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी बडतर्फ केलं होतं. त्यानंतर 59 वाहक आणि 66 चालकांना कामावरून काढून टाकले आहे. एनएमएमटीच्या 15 पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून मुंढे यांच्या कारवाईमुळे एनएमएमटी प्रशासनाला चांगलाच दणका बसला आहे.

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंचा शिवसेनेला दणका, दोन नगरसेवकांची पदं रद्द

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे