Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या दिवशी चंद्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीत बुध आणि शुक्र ग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्रिग्रही योग जुळून येणार आहे.

Trigrahi Yog 2026 : हिंदू पंचांगानुसार, उद्यापासून म्हणजेच 11 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2026) सुरुवात होतेय. या दिवशी घरघरांत घटस्थापना करुन पुढचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. तसेच, उपवास धरले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धार्मिक महत्त्वाबरोबरच ग्रहांच्या चालीलाही ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी चंद्र ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर तूळ राशीत बुध आणि शुक्र ग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्रिग्रही योग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक स्थितीचा कारक ग्रह म्हणतात. तर, बुध ग्रहाला बुद्धी, संवाद आणि व्यवसायाचा कारक ग्रह म्हणतात. शुक्र ग्रह हा सुख-सुविधा, प्रेम आणि कलेचा कारक ग्रह मानतो. त्यामुळे या तीन ग्रहांचं एका राशीत येणं तीन राशींच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामकाजाशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. काही नवीन संधी निर्माण होतील. कोणताही निर्णय तुम्ही नीट विचारपूर्वक घ्याल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन योजना निर्माण करणारा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात तसेच, नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे. समाजात तुमचे वेगवेगळे संपर्क निर्माण होतील. खास व्यक्तींशी भेटीगाठी होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग मेहनत आणि जबाबदारीशी संबंधित असणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. राजकीय क्षेत्रात तुमची प्रगती पाहायला मिळेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असणार? 6 पैकी फक्त 2 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य






















