Holes in Biscuits Reason : लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच बिस्कीट खायला आवडतात. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत देखील बिस्कीट आणि चहाने करतो. सकाळचा नाश्ता असो किंवा कंम्फर्ट फूड प्रत्येकाला बिस्कीटं आवडतात. बाजारात वेगवेगळ्या चवींची आणि दर्जाची अनेक प्रकारची बिस्किटे उपलब्ध आहेत. मात्र, काही बिस्किटांमध्ये अशी छिद्र नसतात. परंतु, अनेक बिस्किटांमध्ये ही छिद्र तुम्ही पाहिली असतील. पण, या बिस्कीटांमध्ये छिद्र का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ही कोणती डिझाईन नाहीये तर यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे कारण नेमकं कोणते ते जाणून घ्या.
यामागे आहे वैज्ञानिक कारण
तुम्ही अनेक प्रकारची बिस्किटे खाल्ली असतील ज्यात अनेक छिद्रे असतात. बर्याच लोकांना असे वाटते की बिस्किटांवर हे छिद्र केवळ डिझाइनसाठी केले जातात, परंतु तसे नाही. खरंतर बिस्किटांमध्ये ही छिद्र बनवणे हा त्यांच्या उत्पादनाचा एक आवश्यक भाग आहे. यामागेही एक प्रकारचे विज्ञान दडलेले आहे. चला जाणून घेऊया...
बिस्किटांमध्ये बनवलेल्या छिद्रांना डॉकर्स म्हणतात
बिस्किटांमध्ये बनवलेल्या या छिद्रांना डॉकर्स म्हणतात. या उदाहरणावरून ते बनवण्यामागचे कारण समजू शकते की जेव्हा घर बांधले जाते तेव्हा त्यामध्ये हवा जाण्यासाठी छिद्र किंवा जागा सोडली जाते. बिस्किटांना छिद्र पाडण्यामागचे कारणही असेच आहे. वास्तविक, बिस्किटमध्ये फक्त छिद्रे ठेवली जातात ज्यामुळे बेकिंग दरम्यान या छिद्रांमधून हवा सहज जाऊ शकते. यासाठी बिस्कीटांमध्ये छिद्र असतात.
म्हणूनच छिद्र केले जातात
खरंतर, मैदा, मीठ, साखर इत्यादी बिस्किटं बनवण्यासाठी मळलेले पदार्थ असतात. हे साहित्य साच्यात पसरून मशीनखाली ठेवले जाते आणि यंत्राच्या साहाय्याने त्यामध्ये छिद्र पाडले जाते. छिद्रांशिवाय बिस्किटं नीट बनत नाहीत, कारण बिस्किटं बनवताना त्यात थोडी हवा भरली जाते. जेव्हा ते ओव्हनमध्ये बेक केले जातात. ही बिस्कीटं गरम झाल्यामुळे ती फुगायला लागतात. अशा परिस्थितीत बिस्किटांचा आकार बिघडण्याचा धोका असतो आणि ते मधूनच तुटू लागतात. म्हणूनच बिस्किटांमध्ये ही छिद्रे फक्त हवा आणि उष्णता काढून टाकण्यासाठी केली जातात.
लोकांना डिझाईन का वाटते?
वास्तविक, बिस्किटे बनवण्यासाठी कारखान्यांमध्ये इतकी हायटेक मशिन्स वापरली जातात की त्या बिस्किटांना समान अंतरावर छिद्र पाडतात. अशा स्थितीत सामान्य माणसाला पाहताच ही डिझाईन आहे असे वाटू लागते.
महत्त्वाच्या बातम्या :