ना UPSC ना NEET, एकच स्वप्न... Vishal Mega Mart मध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी; सोशल मीडियावर व्हायरल ट्रेन्ड
Vishal Mega Mart Security Guard : विशाल मेगा मार्ट सिक्युरिटी गार्ड भरती हे सोशल मीडियावर ट्रेन्ड होत असून त्यावर एकाहून एक भन्नाट मीम्स तयार केले जात आहेत.

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज लावता येत नाही. कधी जुने गाणे अचानक व्हायरल होऊन नव्याने प्रसिद्धीस येईल, तर कधी कुणी रील स्टार रातोरात चर्चेत येईल. अशीच काहीशी घटना आता विशाल मेगा मार्ट संबंधी (Vishal Mega Mart) घडली आहे. विशाल मेगा मार्टमध्ये सिक्युरिटी गार्डच्या नोकरीवरुन (Vishal Mega Mart Security Guard) सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. एकवेळ यूपीएससी किंवा नीट परवडेल, पण विशाल मेगा मार्टमध्ये गार्डच्या नोकरीमध्ये मोठी स्पर्धा आहे अशा आशयाचे विनोद आता व्हायरल होत आहेत. 'आता एकच स्वप्न... विशाल मेगा मार्टमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी' असेही भन्नाट विनोद सुरू आहेत.
Vishal Mega Mart Security Guard Job : सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर जे मिम्स व्हायरल होत आहेत त्यामुळे विशाल मेगा मार्ट चांगलेच चर्चेत आले आहे. सगळ्यांनाच विशाल मेगा मार्टमध्ये नोकरी हवी आहे, त्यासाठी नोकरभरती सुरू आहे अशा आशयाचे विनोद सुरू आहेत. 'योग्य मार्गदर्शन आणि मोटिवेशनच्या अभावे यावेळी विशाल मेगा मार्टमध्ये सिक्युरिटी भरती परीक्षेत नापास झालो' असं एका यूजर्सने लिहिलं आहे. Vishal mega mart chaukidar bharti attempt failed अशा आशयाचे मीम्स फिरत आहेत.
Vishal mega Mart entrance exam m fail ho gya 😭😭😭😭 pic.twitter.com/NJq5Brqx9d
— KALI-YUG 💐 (@brutall_batman) May 17, 2025
Vishal Mega Mart : विशाल मेगा मार्टमध्ये गार्डची नोकरी ट्रेन्ड
भारतात रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्यामुळे अगदी क्लर्क आणि शिपायांच्या काही जागांसाठी लाखो लोकांचे अर्ज येतात. त्यामध्ये काही पीएचडी आणि उच्च शिक्षित लोकही असतात ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे यूपीएससी किंवा नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हायरल होतात. त्यांनी कसा अभ्यास केला, कसं नियोजन केलं याच्या चर्चा होतात. त्याच पार्श्वभूमीवर आता विशाल मेगा मार्टच्या माध्यमातून विनोद सुरू आहेत.
VISHAL MEGA MART❤️🤌 pic.twitter.com/zwSWD0KY87
— 🖤Shreya Mishra💫 (@ShreyaMishra00) May 17, 2025
'विशाल मेगा मार्टमध्ये गार्डची नोकरी' हे सध्या सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहे. त्यावर मीम्स येत आहेत आणि कमेंट्सचा महापूर आला आहे. घराच्या जवळच नोकरी आहे, त्यामुळे यासाठी मोठी स्पर्धा आहे असेही विनोद सुरू आहेत.
Vishal Mega Mart गार्ड भर्ती surpassed even UPSC परीक्षा भर्ती.
— aweSOMe⚡ (@Soumya__13) May 16, 2025
Aspirants are sharing their success stories and preparation strategies. pic.twitter.com/M49Tm5ABIB
Baba ki daya te vishal mega mart security guard ka entrance test pass krliya ji 🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/cioRPM5BZd
— Adv. Bunty (@buntygujjarji) May 16, 2025
Vishal mega Mart security guard requirement 🏃✊ pic.twitter.com/42MmdIVPJs
— ADITYA 🇮🇳 (@troller_Adi18) May 16, 2025
Vishal mega Mart security guard requirement 🏃✊ pic.twitter.com/42MmdIVPJs
— ADITYA 🇮🇳 (@troller_Adi18) May 16, 2025


















