Most Impossible Zaouli Dance : जगातील सर्वात कठीण डान्स (Impossible Dance) कोणता असं विचारलं तर, काही जण, ॲक्रो किंवा बॅलेट डान्सचं नाव घेतील. खरंतर यावर उत्तर मिळणं तसं फार अवघड आहे. जगभरात अनेक प्रकारचे डान्स फॉर्म आहेत. पण सध्या सोशल मीडियावर त्याहूनही कठीण अशा एका डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या डान्सला नेटकऱ्यांनी जगातील सर्वात अवघड डान्स म्हटलं आहे.


आतापर्यंत तुम्ही क्रंप, कंटेम्पररी, बॅलेट, टँगो अशा वेगवेगळ्या डान्सची नावं ऐकली असती. काही डान्सचे व्हिडीओही पाहिले असतील. पण तुम्ही जगातील सर्वात अवघड डान्स पाहिला आहे का? साधारणपणे टॉलिवूडच्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ त्यांच्या भन्नाट स्टेप्समुळे चर्चेत येतात. अलिकडेच RRR चित्रपटातील नाटू नाटू गाणं आणि डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरलल होत असलेला डान्स पाहून तुम्ही नाटू नाटू गाण्याच्या स्टेपही विसराल. आम्ही असं का म्हणतोय याचं कारण तुम्हाला या व्हायरल झालेल्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यावर कळेल.


पाहा व्हिडीओ : जगातील सर्वात अवघड डान्स






'जॅक द रिपर' (Jack The Ripper) नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून या भन्नाट डान्सचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'झाऔली डान्स (Zaouli Dance) हा जगातील सर्वात अवघड डान्स आहे. मध्य आयव्हरी कोस्टमधील हा डान्स आहे.'


काय आहे झाऔली डान्स?


हा डान्स आफ्रिकेच्या मध्य आयव्हरी कोस्टवरील लोकांचे पारंपारिक नृत्य आहे. Djela Lou Zaouli नावाच्या मुलीच्या नावावरून हे नृत्य ओळखल्याचं सांगितलं जातं. झाऔली डान्स सामान्यतः पुरुषांद्वारे केला जातो. यावेळी पुरुष मुखवटे आणि पोशाख परिधान करतात. मुखवटे लाकडापासून कोरलेले असतात आणि चमकदार रंगाचे असतात. या नृत्याला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या


Viral Video : भररस्त्यातच फ्री स्टाईल राडा; लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं