Viral Post : आजपर्यंत तुम्ही इतर वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी पाहिली असेल. पण हेलिकॉप्टरमुळे (Helicopter) रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये कोणीतरी चक्क रस्त्यावर हेलिकॉप्टर पार्क करून पळून गेलंय, हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
लोक आश्चर्यचकित
वरील फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की हे दृश्य पाहून लोक रस्त्यातच गाडी थांबवून आश्चर्याने त्या हेलिकॉप्टरकडे पाहत आहेत. रस्त्यावर पार्क केलेले हे हेलिकॉप्टर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे दृष्य पाहून हे हेलिकॉप्टर रस्त्यावर का उभं ठेवलंय? हे लोकांना अजिबात समजलं नाही. हेलिकॉप्टर रस्त्यामध्ये पार्क केल्याने ही वाहतूक कोंडी कधी सुटेल याची लोक वाट पाहत आहेत. हा फोटो अमन सुराणा (@surana620) नावाच्या युजरने पोस्ट केला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे - बेंगळुरूच्या रहदारीचे कारण. फोटो पाहता, हे क्षेत्र हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे आहे असे दिसते. सोशल मीडियावर यूजर्सही असा दावा करतात की हे चित्र बेंगळुरूचे आहे.
इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले
व्हायरल झालेल्या छायाचित्रात असे दिसून येते की रस्त्यावर उभे असलेले हेलिकॉप्टर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्याभोवती उभे आहेत, तर बरेच लोक बाइक आणि इतर वाहनांवर स्वार होऊन वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. या फोटोने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोवर हजारो लोकांनी कमेंट केल्या असून 26 हजार लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
लोकांचे लक्ष वेधले, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
7 सप्टेंबर रोजी पोस्ट केलेले व्हायरल छायाचित्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. याला 19 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. बर्याच यूजर्सनी त्यांच्या कार्यालयात उशीरा पोहोचण्याचे कारण स्पष्ट करण्यासह यासंदर्भात विनोद देखील पोस्ट केले आहेत. एका यूजरने लिहिले - मी माझ्या बॉसला सांगेन की आज एक चिमणी रस्ता ओलांडत होती, त्यामुळे मला उशीर झाला. आणखी एक कमेंट अशी आली की, HAL परिसरातील रहिवासी त्यांच्या कामासाठी उशीर झाल्याचे निमित्त म्हणून हा फोटो वापरू शकतात. त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले - जर असं काही माझ्यासमोर असेल तर मला ट्रॅफिकची चिंता नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :