Parliament Of India Food Menu: जुन्या संसद इमारतीतील (Old Parliament Building) कामकाजाचा मंगळवारी (19 सप्टेंबर) शेवटचा दिवस होता. जुन्या ऐतिहासिक संसदेला अलविदा देऊन सर्व खासदारांनी अधिवेशनाचं विशेष सत्र नव्या संसद इमारतीत (New Parliament Building) सुरू केलं. यानंतरचे सर्व अधिवेशन हे नवीन संसदेतच (New Parliament) होणार आहेत. नवीन संसदेत कामकाज सुरू झाल्यापासून संसद खूप चर्चेत आहे आणि अशातच आणखी एक चर्चा होते ती म्हणजे संसदेच्या कॅन्टीनची...


संसदेच्या कॅन्टीनमध्ये खूप स्वस्त जेवण (Budget Food) मिळतं आणि तेथील जेवणाच्या किमतींवरुन अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) वाद होत असतो. अशातच आज सविस्तर जाणून घेऊया की नेमका संसदेत कोणता पदार्थ किती रुपयांना मिळतो? संसदेतील कॅन्टीनमध्ये काय खास मेन्यू (Paliament Food Menu) असतो? 


'ही' आहे पदार्थांची लिस्ट


संसदेच्या कॅन्टीनमधील रेट लिस्टमध्ये 2021 ला बदल करण्यात आले होते. इंडिया टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने 2021 मध्ये कॅन्टीन रेटमध्ये बदल केले आणि बऱ्याच पदार्थांच्या किमती वाढवल्या. आधी कॅन्टीनमध्ये चपाती 2 रुपयांना मिळायची, पण आता तिची किंमत 3 रुपये करण्यात आली आहे. यानंतर चिकन, मटणाच्या डिशपण आता महागल्या आहेत, त्यांच्या किमती देखील आधीपेक्षा वाढवण्यात आल्या आहेत. संसदेत कोणते पदार्थ किती रुपयांना मिळतात याची लिस्ट खाली दिली आहे.


या कॅन्टीनमध्ये बटाटा वडा (आलू बोंडा) 10 रुपये, चपाती 3 रुपये, दही 10 रुपये, डोसा 30 रुपये, लेमन राईस 30 रुपये, मटण बिर्यानी 150 रुपये, मटण करी 125 रुपये, ऑम्लेट 20 रुपये, खीर 30 रुपये, उपमा 25 रुपये, सूप 25 रुपये, समोसा 10 रुपये, कचोरी 15 रुपये, पनीर पकोडा 50 रुपयांना मिळतो.बाकीच्या पदार्थांच्या किमतीवर देखील एक नजर टाकूया.





अनलिमिटेड जेवण 500 आणि 700 रुपयांना


संसदेच्या कॅन्टीनमध्ये व्हेज अनलिमिटेड जेवण 500 रुपयांना मिळतं, ज्यात सर्व प्रकारच्या भाज्या, भाताचे विविध प्रकार, बिर्यानी, डाळ, स्विट्स आणि शीतपेय मिळतात. तर अनलिमिटेड नॉन व्हेज जेवण हे 700 रुपयांना मिळतं, ज्यात चिकन आणि मटणाचे विविध प्रकार, स्टार्टर्स, सुकं चिकन, सुकं मटण, करी, भात, स्विट्स असे विविध पदार्थ मिळतात, जे तुम्ही हवे तेवढे मनसोक्त खाऊ शकता. या शिवाय 50 रुपयांना मिनी थाळी आणि 100 रुपयांना मोठी थाळी देखील मिळते, ज्यात 7 ते 8 पदार्थांचा समावेश असतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Parliament Special Session: जुन्या संसद इमारतीला अलविदा, संसद इमारतीत खासदारांचं फोटोसेशन