Pakistan Viral Video : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या (14 ऑगस्ट) कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत चकित करणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील एका शाळेत त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भारतीय देशभक्तिपर गीत वाजवण्यात आले. एवढेच नाही तर या गाण्यावर एका चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्याने सैनिकाच्या गणवेशात सादर केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात भारतीय गाणे वाजल्याने आणि त्यावर उपस्थितांनी दिलेल्या दादमुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Kesari Song In Pakistan : अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील गाणे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' (Kesari Song In Pakistan) या गाजलेल्या चित्रपटातील 'तेरी मिट्टी' हे गाजलेले देशभक्तिपर गीत स्पष्टपणे ऐकायला येत आहे. सुमारे 7 ते 8 वर्षांचा एक लहान मुलगा सैनिकाचा ड्रेस परिधान करून स्टेजवर या गाण्याच्या प्रत्येक बोलावर उत्तम डान्स स्टेप्स सादर करताना दिसत आहे.

Continues below advertisement

Pakistan School Celebration : मागे पाकिस्तानी राष्ट्रध्वज आणि समोर टाळ्यांचा कडकडाट

या व्हिडीओतील सर्वात विशेष बाब म्हणजे, चिमुकल्याच्या मागे स्टेजवर एक मुलगी हातात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज घेऊन उभी आहे आणि गाण्याच्या तालावर तो ध्वज फडकवत आहे. चिमुकल्याचा हा परफॉर्मन्स पाहून समोर बसलेल्या प्रेक्षकांनी, शिक्षकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवला.

Social Media Reaction Pakistan Video : व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

भारताच्या देशभक्तिपर गीतावर थेट पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सादरीकरण होणे, ही बाब अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. "संगीताला आणि कलेला कोणत्याच सीमा नसतात," अशी कमेंट अनेक युजर्स करत आहेत.

ही बातमी वाचा: