Stunt on Tanker Viral Video : अनेक वेळा काही लोक जीवाची पर्वा न करता जीवघेणे स्टंट करताना दिसतात. अशा थरारक स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेळा व्हायरल होतात. काही जणांनी जीवाची पर्वा नसते. लोक कधी रस्त्यावर तर कधी ट्रेनमध्येही विचित्र स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण भयानक स्टंट करताना दिसत आहे. पण नंतर हा स्टंट करणं त्याला चांगलच महाग पडल्याचं दिसत आहे.


सोशल मीडियावर अनेक वेळा धोकादायक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी-कधी हे स्टंट जीवावर बेतल्याचंही पाहायला मिळतात. अनेकांवर पोलिसांची कारवाई होते. पण तरीही स्टंट करणारे लोक काही थांबत नाही आणि शेवटी असे स्टंट करणं त्यांच्या अंगलट येतं. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणासोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. भरधाव टँकरवर स्टंट करताना एका तरुणाचा व्हिडी


या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण भरधाव टँकरवर चढलेला दिसता आहे. बरं हा तरुण टँकरवर फक्त चढून शांत बसत नाही, तर चक्क धोकादायक स्टंट करु लागतो. व्हिडीओमध्ये एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरवर एक तरुण कधी उभा राहताना तर कधी पुशअप करताना दिसत आहे. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील आहे. या व्हिडीओमध्ये तरुण रात्रीच्या वेळी टँकरवर चढून स्टंट करताना दिसत आहे.






पोलिसांनी पोस्ट केला व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्टंटचा व्हिडीओ पोलिसांनी पोस्ट केला आहे. लखनौच्या पोलीस अधिकारी श्वेता श्रीवास्तव (Cop Shweta Shrivastava) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.


तरुणासोबत पुढे काय घडलं?
आता भरधाव टँकरवर स्टंट करणाऱ्या तरुणाचं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा तरुण स्टंट करताना तोल जाऊन रस्त्यावर पडतो. या अपघातात हा तरुण जखमी झाला आहे. असा धोकादायक स्टंट करणं तरुणाला किती महागात पडलं, हे तुम्ही व्हिडीओच्या शेवटी पाहिलंच असेल,