Viral Flying Cycle Video : सोशल मीडियावर (Social Media) कधी-कोणता व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होईल काही सांगता येत नाही. कधी-धी सोशल मीडियावर काही भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओमध्ये लोकांची क्रिएटिव्हीटी दिसून येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे 'फ्लाइंग सायकल'चा. सायकलसोबत काही जण एक्सपेरिमेंट करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. नेटकरी या पठ्ठ्याचे कौतुक करत आहेत.
सायकल चालवता-चालवता चक्क हवेत उडाला माणूस
सध्या इंटरनेटवर 'फ्लाइंग सायकल'चा व्हि़डीओ तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका सायकलवर बसलेला दिसत आहे. पण ही सायकल साधारण सायकल नसून फ्लाइंग सायकल आहे. हा व्हिडीओ 11 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. मोहम्मद जमशेद नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सायकलवर बसून पायंडल मारताना दिसत आहे आणि पाहता-पाहता हा व्यक्ती सायकलसोबत उडताना दिसत आहे.
'फ्लाइंग सायकल' ठरतेय नेटकऱ्यांचं आकर्षण
ही सायकल 'फ्लाइंग सायकल' आहे. या सायकलला विमानाप्रमाणे पंख बसवण्यात आले आहेत. एक व्यक्ती रनवेवर सायकल चालवताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती सायकलवर बसून पूर्ण क्षमतेने पायंडल मारताना दिसत आहे. पायंडल मारता-मारता सायकल अचानक हवेत उडू लागते. ही शक्कल पहिल्या क्षणी एखादा चमत्कार असल्याप्रमाणे वाटतं. पाहणाऱ्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या फ्लाइंग सायकलमध्ये सीटवर पिंजरा बसवण्यात आला आहे. या पिंजऱ्याच्या वरती विमानाप्रमाणे पंख बसवण्यात आले आहेत. सायकलच्या पायंडलची जोडणी पंखांसोबत करण्यात आली आहे. सायकलला पायंडल मारल्याने पंखांना गती मिळते आणि त्यामुळे ही सायकल हवेत उडते. या क्रिएटिव्हीटीचं नेटकरी कौतुक करत आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
हा व्हायरल व्हिडीओ @jamshed_mohamed या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या व्यक्तीने सायकल चालवत विमान उडवण्याचा प्रयत्न केला.' व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या क्रिएटिव्हिटीमुळे चकित झाले आहेत. सायकल हवेत उडताना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत, तर काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.