Israel: ज्यू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. जर तुम्ही या धर्माचा खोलवर अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की याचा इतिहास सुमारे 3000 वर्षे जुना आहे. ख्रिश्चन (Christian), इस्लाम (Islam) आणि ज्यू (Jews) धर्माची सुरुवात त्याच काळात झाली असं म्हणतात. यामुळेच त्यांच्यात बरंच साम्य आहे. दुसरीकडे, जर तुम्ही ज्यू धर्माची हिंदू (Hindu) धर्माशी तुलना केली तर तुम्हाला केवळ काही गोष्टींतच समानता दिसेल.


ज्यू धर्मीय पूजा कशी करतात?


ज्यू धर्मानुसार, जे लोक त्यावर विश्वास ठेवतात ते दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतात. ज्यू जगाच्या पाठीवर कुठेही राहो, पण ते प्रार्थना करताना जेरुसलेमच्या (Jeruslem) दिशेने तोंड करतात. ज्यू धर्मीय मूर्तिपूजेवर विश्वास ठेवत नाही. यासोबतच हे लोक प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानतात. ही प्रथा तर तुम्हाला प्रत्येक धर्मातच आढळेल.


भारतातही ज्यूंची धार्मिक स्थळं


खबाद हाऊस (Khabad House) ज्यूंसाठी खूप खास आहे, तुम्हाला बहुतेक देशांमध्ये हे आढळेल. खबाद हाऊसमध्ये ज्यू लोक प्रार्थना करतात. भारतातही हे खबाद हाऊस आढळतात. दिल्लीतील पहाडगंज, अजमेर, हिमाचलचं धरमकोट, राजस्थानचं पुष्कर आणि मुंबईतही ज्यू धर्मीयांचे खबाद हाऊस बांधण्यात आले आहेत. भारतभेटीसाठी येणारे इस्रायली येथे प्रार्थना करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दरवर्षी इस्रायलमधील हजारो पर्यटक हिमाचल प्रदेशातील धरमकोट, धर्मशाला येथील खबाद हाऊसला भेट देण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात.


पूजेदरम्यान ज्यू धर्मीयांच्या टोपीला विशेष महत्त्व


ज्यू लोक पूजा करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेतात आणि ते म्हणजे, त्यांच्या डोक्यावरील किप्पा. किप्पा ही एक टोपी आहे, जी प्रत्येक ज्यू खास प्रसंगी घालतो. तुम्ही पाहिलं असेल की, बहुतेक धार्मिक ज्यू त्यांच्या डोक्यावर खास प्रकारची एक छोटी टोपी घालतात.


ज्यू धर्मात असं मानलं जातं की, पूजा करताना किंवा कोणताही धार्मिक विधी करताना प्रत्येकाने आपलं डोकं किप्पाने झाकलं पाहिजे. ही गोष्ट हिंदू आणि इस्लाम धर्मियांमध्ये देखील पाहिली जाते. हिंदू धर्मातही पूजा करताना डोक्यावर कपडा ठेवण्याची किंवा टोपी घालण्याची प्रथा आहे. इस्लाममध्येही नमाज पठण करताना टोपी घालणं अनिवार्य मानलं जातं.


हेही वाचा:


Facts: सैन्याचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या 'या' शहरात येतात इस्रायली ज्यू; जाणून घ्या कारण