एक्स्प्लोर

International Internet Day : जागतिक इंटरनेट दिवस! जग इंटरनेटवर झेप घेत असताना... काही देश आजही ऑफलाइन!

29 ऑक्टोबर 1969 अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाममध्ये कॉम्प्युटर ते कॉम्प्युटर मेसेज पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. आणि इथूनच पुढे एका नव्या युगाची सुरुवात सुरु झाली. ती म्हणजे इंटरनेट युग...

International Internet Day : 29 ऑक्टोबर 1969 अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाममध्ये कॉम्प्युटर ते कॉम्प्युटर मेसेज पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. आणि इथूनच पुढे एका नव्या युगाची सुरुवात सुरु झाली. ती म्हणजे इंटरनेट युग... आज अख्खं जग इंटरनेटशी जोडलं गेलंय. माहिती, व्यवसाय, शिक्षण, दळणवळण आणि इतर असंख्य गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्यायत. अन्न, वस्त्र, निवारा यासह इंटरनेटही आजची मूलभूत गरज बनली आहे, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट ही की आज जगात असे काही देश आहेत जिथे इंटरनेट वापरावर बंदी आहेत. तर काही ठिकाणी कठोर निर्बंध आहेत. तर काही देशात सर्वसामान्य जनतेला इंटरनेट अक्सेसच नाही.

उत्तर कोरिया

उत्तर कोरिया हा जगापासून जवळपास डिस्कनेक्ट असलेला हा देश. इथे सामान्य नागरिकांसाठी इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. त्यांना फक्त "क्वांगम्याँग" नावाचं स्थानिक नेटवर्क वापरता येतं. जे सरकारनं तयार केलंय आणि पूर्णपणे सरकारच्याच नियंत्रणात आहे. उत्तर कोरियात फेसबुक, यूट्यूब अजूनही पोहोचलेलं नाही, महत्वाचं म्हणजे उत्तर कोरियातून कुणी बाहेरच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. तर जबर शिक्षाही भोगावी लागते. इथे फक्त उच्च श्रेणीतील परदेशातील अधिकाऱ्यांनाच ग्लोबल नेटवर्कशी कनेक्ट होता येतं. मात्र हुकुमशाह किम जोंग उनच्या सरकारची या सगळ्यावर नजर असते.

तुर्कमेनिस्तान 

इंटरनेटवर निर्बंध असलेला आणखी एक देश आहे तुर्कमेनिस्तान आहे. मध्य आशियातल्या या देशात इंटरनेटवर सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे. फक्त सरकारी सोर्सकडून मिळणाऱ्या इंटरनेटमधूनच लोक जगाशी जोडले जातात. पण इथेही फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब सगळं बंद आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये सरकारविरोधी मत मांडणं म्हणजे भयंकर गुन्हाच आहे.

इराण  

इराणमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी नाही, पण ते कठोर नियंत्रणाखाली आहे. इराण सरकार “National Information Network” नावाचं स्वतंत्र इंटरनेट वापरते. पण प्रचंड अराजकता असलेल्या या देशात आंदोलनं झाली की लगेच इंटरनेट बंद केलं जातं. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम हे सगळं इथं ब्लॉक आहे. लोक VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरुन सोशल मीडिया वापरतात. पण पकडले गेले तर भयंकर शिक्षा मिळते.

चीन

जागतिक व्यापारात अग्रेसर असणाऱ्या चीनमध्ये इंटरनेटच्या वापरावर मात्र प्रचंड मर्यादा आहेत. चीनमध्ये इंटरनेट आहे, पण वापरण्यास हवं तसं स्वातंत्र्य नाही. इथे “The Great Firewall of China” नावाची मोठी सिस्टीम आहे. ही सिस्टिम जगातल्या बहुतेक वेबसाइट्स ब्लॉक करते. त्यामुळे चीनमध्ये Facebook, Instagram सह अनेक सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. त्याऐवजी लोक WeChat, Weibo, Baidu सारखी अॅप्स वापरतात. जी संपूर्णपणे सरकारच्या देखरेखीखाली आहेत. 

क्यूबा

क्यूबामध्ये काही वर्षांपूर्वी इंटरनेट फक्त हॉटेल्स आणि सरकारी ऑफिसेसमध्येच उपलब्ध होतं. आता काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन आहेत, पण सगळं काही मॉनिटर केलं जातं. VPN वापरणं इथे गुन्हा आहे.

आज जग बरंच पुढे गेलंय. विज्ञान तंत्रज्ञानानं अवकाशाच्या पलिकडेही झेप घेतलीये आणि त्यात इंटरनेट हा महत्वाचा दुवा ठरलंय. त्यामुळे देश कुठलाही असो, इंटरनेटवर बंदी म्हणजे मानवी स्वातंत्र्यावर एकप्रकारचं बंधनच.

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget