एक्स्प्लोर

Shaktikanta Das : किती वेळा प्रमोशन मिळाल्यानंतर IAS अधिकारी पंतप्रधानांचा प्रधान सचिव होतो? सर्व्हिस रेकॉर्ड कसे असावे? 

Shaktikanta Das : आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी मिळाली आहे.  

मुंबई : रिझर्व्ह बँकेमधून निवृत्त झालेल्या शक्तीकांत दास यांच्याकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते आता मोदींचे पहिले प्रधान सचिव पीके मिश्रा यांच्यासोबत काम करतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा कार्यकाळ मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळापर्यंत राहणार आहे. 

शक्तिकांत दास हे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटी कायद्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2018 ते 2024 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ होता. आता त्यांच्याकडे पंतप्रधानपदाच्या प्रधान सचिव पदाची जबाबदारी असेल. एखादा आयएएस अधिकाऱ्याला किती वेळा प्रमोशन मिळाल्यानंतर तो प्रधान सचिव होतो याची माहिती आपण घेऊयात.

किती वेळा प्रमोशन मिळायला हवे?

कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला प्रधान सचिव होण्यासाठी दीर्घ अनुभव आणि अनेक पदोन्नती आवश्यक असतात. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून देशाला नवी दिशा देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. एक IAS अधिकारी कनिष्ठ स्केलवर काम सुरू करतो.  पहिली चार वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम केल्यानंतर त्याला पदोन्नती मिळते. नंतर त्याला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि प्रधान सचिव अशी पदे मिळतात. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला किमान 30 ते 35 किंवा त्याहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर आणि अनेक पदोन्नतीनंतर प्रधान सचिव बनवले जाते.

प्रधान सचिवांची नियुक्ती कोण करते?

एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून निवड केली जाते. त्यांचे मुख्य काम पंतप्रधानांना सल्ला देणे, प्रशासकीय कामकाज आणि महत्त्वाच्या सरकारी बाबींवर देखरेख करणे हे आहे. प्रधान सचिवांकडेही पंतप्रधान कार्यालय चालवण्याची जबाबदारी असते. त्यांचे पद हे कॅबिनेट मंत्रिपदाच्या बरोबरीचे असून प्रधान सचिवांचे वेतन सुमारे 2 लाख 50 हजार रुपये आहे.

कोण आहेत शक्तिकांत दास?

शक्तिकांता दास हे तमिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात पदवी प्राप्त केली आहे. त्यांची 2014 मध्ये केंद्र सरकारचे खत सचिव म्हणून नियुक्ती झाली. काही काळानंतर त्यांची अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी आर्थिक व्यवहार सचिव आणि 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget