Solapur News : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. नगरपरिषद निवडणूकीसाठी जिल्ह्यात तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. उमरगा, धाराशिव, कळंब नगर परिषदेसाठी सरनाईक सभा घेत आहेत. अशातच या प्रचारसभांच्या निमित्याने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची पाहणी केली. यावेळी सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप अनावर झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी, आगार प्रमुखला प्रताप सरनाईक यांनी जागेवर निलंबित करत कारवाई केली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्टॅन्डची पाहणी केली होती. त्यावेळी एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छ असल्याचे सांगत त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवा बस आगार स्वच्छतेचं आगार बनल्याचेही त्यांनी नमूद केलं होतं. मात्र आठवडा उलटूनही परिस्थिती जैसे थेचं असल्याचे लक्षात येताच आगार प्रमुखला मंत्री प्रताप सरनाईकांनी जागेवर निलंबित करत कारवाई केली आहे.

नाईलजाने मला आगार प्रमुखला निलंबीत करावे लागतं

सोलापूर बस आगार आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील सुधारणा न झाल्याने अखेर परिवहन मंत्र्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे याना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. यावेळी मंत्री सरनाई म्हणाले कि, मागच्या आठवड्यात मी अचानक आल्यावर प्रचंड भयानक आणि विदारक अवस्था दिसली. सोलापूर एसटी स्टॅन्ड हे अस्वछतेचे आगार बनले होते, पिण्याच्या पाण्याची ठिकाणी देखील स्वच्छता नव्हती. प्रत्येक वेळी कारवाई करणे योग्य नाही, म्हणून मी आठवडाभरात सुधारणा करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर देखील सुधारणा नाही, पिण्याच्या पाण्याची केवळ एक तोटी सुरू आहे. नाईलजाने मला आगार प्रमुखला निलंबीत करावे लागत आहे, जनतेला सुविधा मिळावी हा आमचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Continues below advertisement

राज्यभरातील एसटी स्टॅन्डवर स्वच्छता राहिली पाहिजे, पण कारवाई केल्यानंतर डोळे उघडणार असतील तर आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यात तीन सभा

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आजपासून दोन दिवसात नगरपरिषद निवडणूकीसाठी जिल्ह्यात तीन सभा आहेत. उमरगा, धाराशिव, कळंब नगर परिषदेसाठी सरनाईक सभा घेता. तर दुसरीकडे तानाजी सावंत एकट्याने लढत असलेल्या भूम आणि परंडा नगर परिषदेकडे त्यांनी पाठ फिरवली. अगोदरच सावंतांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. त्यामध्ये आता पक्षाच्या नेत्यांकडूनही अंतर राखल्याने चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही महायुतीच्या मुंबईतील बैठकीमध्ये सावंत यांची गैरहजेरी पाहायला मिळाली होती.

हेही वाचा