परभणी: परभणीच्या गंगाखेडमधील कस्तुरबा गांधी विद्यालयातील 3 मुलींनी वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपापसातील भांडणातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी तर एका मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. संबंधित प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून गृहपालाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गंगाखेड शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील 8 वीतील विद्यार्थीनीमध्ये वाद झाल्यानंतर तीन विद्यार्थीनींनी वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पूजा पवार नावाची विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर पायल चव्हाण या विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर इजा झालीय.तर उडी मारत असताना प्रीती चव्हाण या मुलीला गेटवरील कर्मचाऱ्याने अलगत पकडले असल्याने ती जखमी झाली नाही.

तहसीलदारांनी शाळेची केली पाहणी-

तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्यानंतर गंगाखेडचे तहसीलदार यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. दुसरीकडे गंगाखेडचे गटशिक्षण अधिकारी यांनी ग्रहपाल यांच्याकडून खुलासा मागवला आहे. तो आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवल्यानंतर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सरीकडे जखमी मुलीने त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर मुख्याध्यापिकेने कारवाईची धमकी दिल्याने उडी मारल्याचे सांगितले आहे.

संबंधित बातमी:

Bhiwandi Crime News: मौलवीला लहान मुलांशी शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं; शोएबचा गळा दाबून मृतदेह दुकानात पुरला, भिवंडीत दृश्यम स्टाईल गुन्हा