The Vaccine War : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर विवेक अग्निहोत्री यांनी एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमात नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना काही नेत्यांनी मात्र या सिनेमाचे खास शो आयोजित केले होते. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत असताना विवेक अग्निहोत्रींनी 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमाची घोषणा केली आहे. आता या सिनेमाचे शूटिंग संपले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'द वॅक्सीन वॉर'चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"अधिकृत घोषणा... राष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रामाणिक आणि दर्जेदार अभिनेता नाना पाटेकर 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 






विवेक अग्निहोत्री म्हणाले,"द वॅक्सीन वॉर' या सिनेमासाठी आम्ही एका चांगल्या कलाकाराच्या शोधात होतो. आम्हाला सर्वगुणसंपन्न अभिनेत्याची गरज होती. नाना पाटेकर अनेक चांगल्या कलाकृतीचे भाग आहेत. त्यामुळे या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी आम्ही त्यांना विचारणा केली. त्यांनी आपल्या भूमिकेसाठी 100 टक्के दिले आहेत". 


विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले,"द वॅक्सीन वॉर' या सिनेमासाठी पल्लवी जोशी आणि नाना पाटेकर यांची निवड केल्याचा मला आनंद आहे. दोघांनीही आजवर अनेक सिनेमांत काम केलं आहे. नाना पाटेकरांसारखे कलाकार माझ्या सिनेमाचा भाग असणं ही खरचं खूप मोठी गोष्ट आहे". 


'द वॅक्सीन वॉर' 15 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; 'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना