झटपट कमाईचे आमिष अंगलट, ऑनलाईन सट्ट्यातून उच्च अधिकाऱ्याने 11.50 कोटी गमावले
Cyber Fraud : एक 46 वर्षाच्या व्यावसायिक व्यक्ती बोगस ऑनलाईन सट्टा या वेबसाइटच्या जाळ्यात अडकूण 11.50 करोड रूपये गमावले आहेत.

लवकर श्रीमंत होण्याची इच्छा कधीकधी आपल्याला धोकादायक ठरू शकते आणि आपण अशा फसवणूक करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकतो आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी आपण गमावून बसतो. तर असेच एका व्यक्ती सोबत घडले आहे. एका 46 वर्षांच्या व्यवसायिक व्यक्तीने बोगस ऑनलाईन सट्टा वेबसाईटच्या जाळ्यात अडकूण 11.50 करोड रूपये गमावले आहेत. या प्रकरणाची 1930 सायबर फ्रॉड हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली आहे. आणि आत्तापर्यंत सर्वात मोठी ऑनलाईन सट्ट्यातून फसवणूक झाली आहे अशी माहिती मिळाली आहे.
11 .50 करोड रूपयांची फसवणूक
या फ्रॉडमध्ये बळी पडलेला हा कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. MBA पास आणि वर्षाला करोडो रुपये कमावणार व्यक्ती आहे. हा व्यक्ती एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत आहे. एका ऑनलाईन जाहिरातमुळे त्याची फसवणूक झाली, एके दिवशी त्याच्या मोबाइलवर एका रॉलेट कसीनोची जाहिरात आली, आणि तो नकळत त्या बोगस वेबसाईटवर पोहोचला. सुरूवातीला वेबसाईट वरून त्याला थोडासा नफा झाला. त्यानंतर हळू हळू त्याचा त्या वेबसाईटवर विश्वास तयार झाला आणि त्याने त्यामध्ये इंवेस्ट करायला सुरुवात केली. पोलीसांच्या मते त्याने 17 करोड रूपये इंवेस्ट केले होते आणि त्यानंतर त्याला 11.50 करोड रूपयांची फसवणूक झाली. तीन महिन्यापासून सायबर फसवणूक चालू होती. आणि 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत होते.
जेव्हा त्या व्यक्तीला कळाले, की फसवणूक झाली आहे त्याने लगेचच भारत सरकारच्या सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदणी केली. गृह मंत्रालयाच्या सायबर जागरूकता मोहिमेच्या 'सायबर दोस्त' च्या एक्स-हँडलवरही ही बाब पुष्टी केली आहे. पोलीस अधिकार्यानी माहिती दिली की 1930 हेल्पलाईन वर आत्तापर्यत नोंद झालेली सर्वात मोठी सायबर फ्रॉड केस आहे. आत्ता पर्यंत स्पष्ट झाले नाही आहे की फसवणूक करणारे इतके दिवस पैसे काढत राहिले, पण कोणताही ट्रॅकिंग नाही झाली. पोलीस सध्या या प्रकारणाची कसून चौकशी करत आहे.
ऑनलाईन लालच देणाऱ्या पासून सावध राहा, कधीही माहिती घेऊन कामे करा आणि अशा अॅप किंवा ऑनलाईन वेबसाईटवर बळी पडू नका.























