Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.


3.  टीआरपी लिस्टमध्ये 'रंग माझा वेगळा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.


5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.


6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.  


8. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.3 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'मी होणार सुपरस्टार' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.9 रेटिंग मिळाले आहे.


महाएपिसोडला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!


मराठी मालिकांप्रमाणे त्यांच्या महाएपिसोडला अर्थात विशेष भागांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या महाएपिसोडला 5.4 रेटिंग मिळालं आहे. तर नुकत्यातच पार पडलेल्या 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेच्या महाएपिसोडला 4.1 रेटिंग मिळालं आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण तरीही ही मालिका पहिल्या क्रमांकापासून लांब आहे. तर जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


संबंधित बातम्या


Telly Masala : मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय ते 'कोण होणार करोडपाती' मध्ये प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...