'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
या घटनेनंतर डोंबिवली आणि कल्याण परिसरातील डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. "सुरक्षेची हमी नसेल तर डॉक्टरांनी काम कसे करायचे?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

Ramesh Mhatre Dombivli Case: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर वृष्टी बाविस्कर अजूनही सावरलेल्या नाहीत. या घटनेमुळे डॉक्टर वृष्टी यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून, त्या झोपेतही "ते मारतात... मारतात..." अशी बडबड करत दचकून जाग्या होत आहेत. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून तिच्या आई-वडिलांची चिंता वाढली आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर वृष्टी बाविस्कर आणि उपस्थित नर्स यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गलिच्छ शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. रुग्णावर उपचार करण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे. लोकप्रतिनिधीनेच थेट रुग्णालयात घुसून महिला डॉक्टरांवर हात उचलल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून आणि स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
WHEN A RULING PARTY BECOMES DRUNK ON THE INTOXICANT OF POWER AND ENTITLEMENT.
— Rahul Shivshankar (@RShivshankar) July 7, 2026
Shiv Sena (Shinde faction) corporator Ramesh Mhatre allegedly assaulted a female doctor, a gynecologist, and multiple nursing staff members at the Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC)-run… pic.twitter.com/LeCX0zETle
झोपेतही मारहाण मारहाण म्हणत दचकत जाग्या
या जीवघेण्या हल्ल्याने डॉक्टर वृष्टी यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वृष्टीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेला काही दिवस उलटूनही त्या या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेल्या नाहीत. त्या गाढ झोपेत असतानाही अचानक घाबरून ओरडतात. "ते मारतात, मला मारतात..." अशी बडबड करत त्या प्रचंड घाबरून जातात . पोटच्या मुलीची ही मानसिक दुरवस्था डोळ्यांनी पाहत असल्याने तिचे आई-वडील खचले आहेत. आमची मुलगी रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर झाली, पण लोकप्रतिनिधींकडून तिला अशी अमानुष वागणूक आणि मारहाण आणि अश्लील गलिच्छ शिव्या ऐकायला मिळतील असा विचारही आम्ही केला नव्हता. ती अजूनही त्या भीतीच्या सावटाखाली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप, म्हात्रेंवर कारवाई कधी?
या घटनेनंतर डोंबिवली आणि कल्याण परिसरातील डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. "सुरक्षेची हमी नसेल तर डॉक्टरांनी काम कसे करायचे?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई होणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दाबले जाणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू






















