एक्स्प्लोर

मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना

उल्हासनगरहून पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीने मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा भीषण अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

ठाणे : राज्यातील रस्ते अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. याउलट वेगवेगळ्या कारणास्तव रस्ते अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्याच महिन्यात मुरबाडमध्ये एका पिकअप वाहनाचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता, पुन्हा एकदा कल्याण-मुरबाड-नगर (Kalyan) महामार्गावरील वरपगाव परिसरातून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला अपघात होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

उल्हासनगरहून पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीने मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा भीषण अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ​वरप येथील हनुमान मंदिराजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात या दोन्ही तरुणांची दुचाकी थेट ट्रकच्या मागच्या टायरखाली आली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये दोघेही तरुण गंभीर चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राजू गुप्ता आणि पवन गुप्ता अशी मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची नावे असून ते उल्हासनगरचे रहिवासी होते. 

अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात (सेंट्रल हॉस्पिटल) पाठवले आहेत. मित्राला भेटायला जातानाच दोन्ही तरुणांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळबळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर उल्हासनगरमधील त्यांच्या निवासस्थानी, परिसरात शोककळा पसरली आहे. ओव्हरटेक करताना झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी टिटवाळा पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

हेही वाचा

आधीच टंचाई, त्यात डिझेलचा टँकर पलटी; अपेक्षेप्रमाणे ड्रम, बॅरेल घेऊन लोकांची घेऊन गर्दी, पोलिस घटनास्थळी दाखल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
धक्कादायक! हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक
धक्कादायक! हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक
Operation Tiger UBT Shivsena: पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या बाजूला बसलेला खासदारही फुटणार? ऑपरेशन टायगरमध्ये नाट्यमय वळण, नक्की काय घडणार?
पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या बाजूला बसलेला खासदारही फुटणार? ऑपरेशन टायगरमध्ये नाट्यमय वळण, नक्की काय घडणार?
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget