Thane Water Supply News: ठाणे पालिकेच्या (Thane ) वतीने शहरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्यामुळे ठाण्यातील पाणीपुरवठा (Thane Water Supply) शुक्रवारी विस्कळीत होणार आहे. शुक्रवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9 ते शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा (No Water Supply in Thane on Friday) बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल, दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या (Thane ) जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामांसाठी हा 24 तासांचा शट डाऊन (Water Shut Down) घेण्यात येणार आहे .
ठाण्यात शुक्रवारी स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीची (Water Line Maintenance) कामं केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती करुन व्हॉल्व (Water Valve) बदलेले जाणार आहेत.
या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9 ते शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा (Water Supply) होईल. नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिकेने केले आहे.
गुरूवारी कोपरीत पाणी नाही
कोपरी (Kopri) येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची 500 मिमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी (Main Water Pipeline) विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत (Shifting) करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन (Cross Connection) घेण्यात येणार असल्याने गुरूवार, दिनांक 25 मे सकाळी 9 पासून ते शुक्रवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तासांसाठी कोपरी (Kopri) परिसरातील धोबीघाट (Dhobighat) आणि कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे.