मुंबई उत्तर भारतातल्या सीमा हैदर (Seema Haidar)   प्रकरणासारखंच एक प्रकरण ठाण्यात घडलंय. फेसबुकवर पाकिस्तानच्या (Pakistan)  एका तरुणाशी ओळख झाली, आणि त्याच्याशी लग्न करायचं म्हणून ही तरुणी चक्क ठाण्याहून पाकिस्तानला गेली. रावलपिंडीजवळच्या अबोटाबादमध्ये ही तरुणी राहत होती. तिथं ती काही महिने राहिल आणि 17  जुलै रोजी भारतात परतली. ठाणे पोलिसांना हे कळताच त्यांनी या तरुणीला बोलावून घेतलं, तिची चौकशी सध्या सुरू आहे. ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करतायेत. एकदा पक्की माहिती मिळाल्यावर ते माध्यमांना माहिती देणार आहेत.  


लग्नासाठी सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली तर  अंजू  भारतातून पाकिस्तानात गेली. फेसबुकवर ओळख झाली आणि देशाच्या सीमा पार करत या आपल्या प्रेमासाठी गेल्या. आता या यादीत आणखी एक भर पडलीय आहे.  आपल्या ठाण्यातून एका तरुणीने लग्नासाठी पाकिस्तान थेट गाठलं. फेसबुकवरवर पाकिस्तानातील एका तरुणाशी या तरुणीने आणाभाका घेतल्या आणि ठाणे ते एबोटाबाद हे 1 हजार 662  किलोमीटरचं  अंतर पार करत या तरुणीने लग्नही केलंय.


तरुणीची चौकशी सुरू


महत्त्वाचं म्हणजे ही तरुणी पाकिस्तानातील  रावळपिंडी येथे काही महिने राहून पुन्हा  भारतात आलीय. आता ती पुन्हा पाकिस्तानात जाणार असल्याचं सांगितलं जातंय. या तरुणीने पाकिस्तानात जाण्यासाठी खोटी कागदपत्र बनवल्याचा संशय व्यक्त केला जातोय. म्हणूनच पोलिसांनी आता या तरुणीची चौकशी सुरू केलीय


पाकिस्तानात लग्न केल्याचा दावा


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षाच्या नगमाची ओळख फेसबुकवर झाली. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी ती पाकिस्तानला गेली. तिथे महिलेने लग्न केल्याचा दावा केला आहे. तसेच तिच्याकडे निकाहनामा (विवाह नोंदणी प्रमाणपत्र) देखील मिळाले आहे.  


सीमेपलीकडील प्रेमकहाण्या


या वर्षाच्या सुरुवातीला जोधपूरच्या मुझम्मील खानने ऑनलाइन माध्यमातून पाकिस्तानच्या उरुज फातिमाशी लग्न केलं. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी सीमा हैदरने 13 मे रोजी राबुपुरा भागात राहणारा तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासोबत राहण्यासाठी नेपाळमार्गे बसमधून तिच्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केला. यानंतर ती ग्रेटर नोएडा पोहोचली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं.


हे ही वाचा :


Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरला पती सचिनकडून मारहाण? चेहरा आणि हातावर जखमेच्या खुणा; VIDEO व्हायरल