Thane: गर्लफ्रेंडशी फोनवर भांडण झाल्यानं तरुणानं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलल्याची घटना आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात मुंब्रा भागातील अमृत नगरमध्ये घडलीय. प्रेसयीशी भांडणानंतर तरुणाचा मानसिक संतूलन ढासळल्यानं त्यानं हे भयंकर पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समजतंय. घटना घडल्यानंतर घरातील कुटुंबातील सदस्यांना कळलं तेंव्हा मोठी खळबळ उडाली. त्यांनी तातडीनं पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस तरुणाच्या म़त्यूशी भांडणाशिवाय आणखी काही कारण जोडले आहे का? याचा तपास करत आहेत. (Thane News)
नक्की घडले काय?
मुंब्रा येथील अमृत नगरमध्ये एका १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. फोनवर प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलत होता. या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की, मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने स्वतःला संपवलं. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भांडणाचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या आत्महत्येमागे अजून काही कारण आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलिस तरुणाचे कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती तपासत आहेत.दरम्यान, एका फोन कॉलमुळे एका तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणांनी मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.
आपली जोडी शोभत नाही म्हणत नवरदेवानं मोडलं लग्न, नवरीनं उचललं टोकाचं पाऊल
मुलगा व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका सतीश सुरवसे (22, रा. डिसलेवाडी ता. जामखेड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मोनिकाचा विवाह कर्जत येथील महेश मेंगडे याच्याशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर 'तू मला आवडली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही' असे म्हणत महेशने मोनिकाला अपमानित केले होते. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे हेही मुलीच्या वडीलांना म्हणत होते की, 'तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही'.