Thane Election : ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर शिवसेनेने भाजपसोबत युती केली तर उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार हे पुन्हा ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाण्याबाबत सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांनी घ्यावा असा निर्णय झाल्याची माहिती आहे.

Continues below advertisement


ठाणे महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या शहराने दिला. शिवसेना फुटीनंतरही एक वगळता सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने गेले. त्यामुळे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंची ताकद जास्त आहे.


Thane Municipal Corporation Election : ... तर उमेदवार ठाकरेंकडे जाऊ शकतो


अशा वेळी जर महायुतीमधून निवडणूक लढवली तर त्यातील काही जागा या भाजपला द्याव्या लागतील. याचा फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे यांच्यासोबतचे आजी माजी नगरसेवकांनी त्या त्या ठिकाणी तयारी केली आहे. अशा वेळी जागावाटपात ती जागा भाजपकडे गेल्यास नाराजी वाढू शकते आणि तो उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ठाणे महापालिका निवडणुकीचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


Shivsena Meeting : पदाधिकाऱ्यांची स्वबळाची मागणी


ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असताना भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी त्या ठिकाणी अनेकदा हस्तक्षेप केल्याचं दिसतंय. गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी परस्पर स्वबळाचा नारा देत शिंदेंना डिवचल्याचंही दिसून आलं. त्यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. भाजप नेत्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेनेही स्वबळावर लढावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे. 


ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येंही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे. ठाण्यातील संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होत असलेल्या वक्तव्यांमुळे शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.


ही बातमी वाचा: