Nepal Floods Updates Maharashtra Tourist विरार: कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले विरारचे माजी नगराध्यक्ष तथा श्री जीवदानी देवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडूलकर (Pradip Tendulkar) हे नेपाळमध्ये झालेल्या भीषण क्लाउडबर्स्ट आणि फ्लॅश फ्लड (Nepal Floods) दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. दुर्घटना घडण्याच्या अवघ्या चार-पाच तास आधी त्यांनी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता, ते हॉटेल महापुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

22 तारखेला कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या तेंडूलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रवास सध्या सुरू आहे. यात्रेतील सर्वांत उंच आणि अत्यंत आव्हानात्मक असलेल्या सुमारे 18 हजार 500 फूट उंचीवरील डोलमाला पास येथे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. तेथून पवित्र कैलास पर्वताचे दर्शन होत असून भाविकांची यात्रा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या यात्रेदरम्यान नेपाळमध्ये घडलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी केली. तेंडूलकर यांच्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या काही तास आधीच त्यांचा गट इमिग्रेशन कार्यालयात होता. त्यानंतर त्यांना व्हिसा मिळाला आणि त्यांनी तिबेट अर्थात चीनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग आलेल्या भाविकांसाठी मात्र मार्गच उद्ध्वस्त झाला असून प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव मार्ग बंद केल्याचे त्यांनी सांगितले. (Nepal Floods Updates)

ज्या ठिकाणी राहिलो होतो, ते हॉटेलच पूर्णपणे वाहून गेले- (Nepal Floods Updates Maharashtra Tourist)

आम्ही आदल्या दिवशी ज्या ठिकाणी राहिलो होतो, ते हॉटेलच पूर्णपणे वाहून गेले. ते नदीच्या पात्राजवळ होते. आम्ही चार-पाच तास आधीच तेथून बाहेर पडलो होतो. त्यामुळे आमचा जीव वाचला,” असे सांगताना प्रदीप तेंडूलकर यांचा आवाज भावूक झाला. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेल्याचे सांगत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “आमचा जीव वाचला याचा आनंद करण्यापेक्षा, इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी आपले प्राण गमावले, हे अत्यंत दुःखदायक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Continues below advertisement

निसर्गाच्या प्रचंड रौद्ररूपाची साक्ष देणारी आपबिती- (Nepal Floods Updates Maharashtra Tourist)

वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर यांचे ही प्रदीप तेंडुलकर चांगले मित्र आहेत, त्यांनी ही समाधान व्यक्त केलं. तसेच वसई विरारमधील कुणीही, नेपाळ दुर्घटनेत अडकल्याची अथवा मृत्यूमुखी नसल्याची माहीती वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी दिली. सध्या भारत, नेपाळ आणि चीन या तिन्ही देशांकडून अडकलेल्या भाविकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी आणि बंद झालेले मार्ग खुले करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत्यूच्या दारातून थोडक्यात परतलेल्या विरारच्या या यात्रेकरूने सांगितलेली ही आपबिती अत्यंत हृदयद्रावक असून, निसर्गाच्या प्रचंड रौद्ररूपाची साक्ष देणारी आहे.

नेपाळमधील मृतांची संख्या 788 वर, 2500 हून अधिक लोक बेपत्ता- (Nepal Flood Updates)

नेपाळमध्ये आलेल्या महापुराला पाच दिवस उलटून गेले आहेत, मात्र अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. मृतांची संख्या 788 वर पोहोचली आहे, तर 2,500 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. हजारो कुटुंबे आपल्या प्रियजनांच्या शोधात व्यस्त आहेत. दरम्यान, अनेक मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटलेली नाही. असे मृतदेह आढळल्यास ओळखीशी संबंधित पुरावे सुरक्षित ठेवून अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्याचबरोबर अनेक भागात पाणी वाढल्याने बचावकार्यही कठीण होत आहे.

संबंधित बातमी:

ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?