Ajit Pawar : ठाण्यामध्ये 100 जणांना गरज नसताना संरक्षण दिले गेलेय. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संरक्षणाची गरज नाही. काही नावं अशी आहेत त्यांचे व्यावसाय वैगरे आहेत. त्यांना सरकारी खर्चातून संरक्षण देण्याची गरज आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. वर्षभरापूर्वी याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली आहे, पण याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर आले नाही, असे अजित पवार म्हणाले.
ठाण्यात ज्यांना संरक्षण दिलेय, त्यांची यादी माझ्या हातात आहे. यातील काही जणांना संरक्षण द्यायची गरज नाही, फक्त दाखवण्यासाठी सुरू आहे. 100 लोकांना संरक्षण दिले जाते त्याचा खर्च शासनावर पडतो, असे पवार म्हणाले. या 100 जणांमध्ये एक पोलिस निरीक्षक शेखर बागडे याचाही समावेश आहे. त्याची एवढी मोठी संपत्ती आहे, त्याबाबत तक्रार आली आहे. मी पण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. सरकार पैश्याच्या जोरावर यांचा मोठेपणा का वाढवत आहेत? सरकारने ठाणे जिल्ह्यातील किती लोकांना संरक्षण दिले यादी जाहीर करावी, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय.
अजित पवार यांनी शेखर बागडे यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिस ऑफिसरकडे इतकी मोठी संपत्ती कशी असू शकते, बेहिशोबी मालमत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे माहिती आहे. शेखर बागडे याच्या संदर्भात बेहिशोबी मालमत्ता जमा केली. पुणे अधिकाऱ्याकडे सहा कोटी मिळाले, अश्या घटना वाढत आहेत. शेखर बागडे यांच्याविरोधात केस दाखल केली होती, भाजप त्या विरोधात उतरले होते. हे प्रकरण एसीबीकडे द्या, अशी माझी गृहमंत्री यांच्याकडे मागणी आहे, असे अजित पवार म्हणाले. ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदावर आहोत, त्यांनी याचे बारकावे लक्षात घेऊन तणाव निर्माण होणार नाही. ठाण्यात राहून मग्रूरपणा करत असेल तर कोणाचा वरदहस्त असेल, हा कसा काय बेफाम वागतो, असा सवालही पवारांनी उपस्थित केला.
भाजप-शिंदे वादावर काय म्हणाले दादा -
आम्ही पण १५ वर्ष काम करत होतो, भांड्याला भांडे लागते वाद होतात . जाहिरात दिल्यावर 24 तासाच्या आत दुसरी जाहिरात द्यावी लागली. शिवसेना शिंदे गटाला बॅकफूवर जावे लागले, असे पवार म्हणाले. काल कशी जाहिरात कशी देण्यात आली होती, आज पुन्हा जाहिरात देण्यात आली त्यातील मजकूर पहिला आहे. कालच्या जाहिरात सरवा सारव करण्याचा प्रयत्न आज झालं का? असा प्रश्न पडतो. मी सांगतो बूँद से गयी वो हौद से नाही जाती...