ठाणे:पोलीस छापा टाकायला गेले, पण आत पोहोचताच उघड झालं एक मोठं रॅकेट. अलार्मचा इशारा, गुप्त खोली, पळवाट आणि बारबालांचं भयाण वास्तव… मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड परिसरातील ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या सर्व गोष्टी उजेडात आली.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारवर सोमवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या बारमध्ये पोलिसांच्या येण्याची वर्दी देण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ ‘अलार्म बटन’ बसवलेलं होतं. पोलीस आले की कर्मचारी तो बटन दाबायचे, आणि लगेचच बारमध्ये दिवे लागायच.

ही एक सिग्नल पद्धत होती, त्यानंतर बारबाला लगेचच मागे पळायच्या. या छाप्यात पोलिसांना मेकअप रूमच्या मागे एक गुप्त दरवाजा सापडला. चावीच्या सहाय्याने हा दरवाजा उघडल्यावर मागे एक अरुंद बोळ, आणि त्याच्याशी जोडलेली गुप्त खोली सापडली. याच ठिकाणी 11 बारबाला लपलेल्या अवस्थेत आढळल्या.

Mira Road Kem Cho Bar Raid : बारमध्ये 20 ते 25 बारबाला

मिरा भाईदर मध्ये 30 ते 35 बार आहेत. या बारना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. पण बार चालू असतात ते चार वाजेपर्यंत. या सर्व बारमध्ये प्रत्यक्षात गाणं म्हटलं जात नाही. बारबालांना ‘सिंगर’ म्हणून दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात वाजणारं गाणं असतं रेकॉर्डेड, आणि त्या फक्त ओठ हलवत असतात. रात्रीच्या सुमारास महिला आणि पुरुष मिळून फक्त 8 सिंगर ठेवण्याची परवानगी असते. मात्र या ठिकाणी 20 ते 25 बारबाला असतात.

दरमहा लाखो रुपयांचा हप्ता

मिरा रोडच्या केम छो हा बार मिरा भाईंदर पालिकेने अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता. मात्र तो पुन्हा सुरु झाला. ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून मिरा भाईंदरमध्ये दरमहा लाखो रुपयांच्या हप्त्यांचे मोठं सिंडिकेट चालत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या बारमध्ये अनेकांच कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे.

व्यवस्थेला दिलेला धोका

एका ऑर्केस्ट्रा बारमधील हे ‘मायाजाल’ म्हणजे कायद्याला आणि सामाजिक व्यवस्थेला दिलेला मोठा धोका आहे. गुप्त खोली, अलार्म सिस्टीम आणि हप्त्यांचं नेटवर्क, या सर्वांमुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

ही बातमी वाचा: