Mira Bhayandar : मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला एक नवीन उड्डाणपूल (Flyover) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या पुलाच्या विचित्र रचनेमुळे नागरिक आणि नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत असून, प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरातील मिरा रोड ते भाईंदरला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पुलाची सुरुवात 4-लेन (4-Lane) च्या भव्य रुंदीने होते. मात्र, पुलाच्या मधोमध गेल्यावर हा रस्ता अचानक अरुंद होतो आणि दुसऱ्या टोकाला तो केवळ 2-लेनचा उरतो. (Flyover In Mira Bhayander)

Continues below advertisement

Mira Bhayandar News :  'Engineering Marvel', सोशल मीडियावरटीकेचावर्षाव

सामान्यतः उड्डाणपूल हे वाहतूक वेगाने जाण्यासाठी बांधले जातात. मात्र, या पुलाच्या रचनेमुळे 'बॉटलनेक' (Bottleneck) परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 पदरी रस्त्यावरून वेगाने येणारी वाहने जेव्हा अचानक 2 पदरी अरुंद रस्त्यावर येतात, तेव्हा तिथे वाहनांच्या रांगा लागण्याची आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि 'सोशल मीडिया पेजेसनी यावर उपरोधिक टीका केली आहे. "हे कसले इंजिनिअरिंग?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काहींनी याला "नियोजनशून्य कारभार" म्हटले आहे, तर काहींनी या पुलाचा उल्लेख गमतीने 'Engineering Marvel' असा केला आहे.

Continues below advertisement

Flyover In Mira Bhayander: वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होण्याची भीती

सूत्रांच्या माहितीनुसार, या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि जागेच्या उपलब्धतेमुळे पुलाची रचना अशा प्रकारे करावी लागली असावी. परंतु, पुलाचे रुंदीकरण पूर्ण झाल्याशिवाय येथील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत अजून संबंधित एमएमआरडीए विभागाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Mumbai News : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन जमिनीवर अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यानगोंधळ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर या अतिक्रमणा विरोधात जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आत मध्ये राहणारे आदिवासी आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. मात्र ही सर्व कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्याचे संजय गांधी नॅशनल पार्क प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्या सगळ्या गोंधळानंतर तणावाच वातावरण निर्माण झाल्याने संजय गांधी नॅशनल पार्क आजच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर मुख्य गेटवर बॅरिगेटिंग केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1995 च्या आधीपासून राहणाऱ्या आदिवासींना संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये राहण्यास परवानगी आहे. त्यानंतर राहायला आलेल्या आदिवासींना करे देऊन त्यांना पुनर्विकासाचा लाभ मिळाल्याचं प्रशासनाचे म्हणणं आहे. मात्र असं असताना पुन्हा एकदा काही जणांकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा