एक्स्प्लोर

गुडन्यूज! म्हाडाकडून 5,285 घरांची सोडत जाहीर, 77 भूखंड खरेदीचीही संधी; ठाणेकरांच्या स्वप्नातलं घर

3 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) (Mhada) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे (Thane) शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग),  कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदर सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवार 14 जुलै, 2025  रोजी दुपारी 1 वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदर सोडतीसाठी 13 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. 14 ऑगस्ट, 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट, 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक 1 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.          

3 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. कोकण मंडळाच्या संगणकीय सोडतीमध्ये IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने अर्ज नोंदणी प्रक्रियेस १४ जुलै, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून सुरवात होणार आहे. सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदार IHLMS 2.0 ही सोडतीची संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android)अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी केले आहे.  

कोणाही दलालाच्या अमिषाला बळी पडू नये - 

सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गायकर यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.  तसेच त्यांनी आवाहन केले आहे की सोडत प्रक्रियेमध्ये म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग घ्यावा.   

हेही वाचा

मोठी बातमी! जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा मोठा सस्पेन्स; प्रदेशाध्यक्षपदाबाबत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget