Kondeshwar Temple Waterfall, Bhoj, Badlapur, Maharashtra : सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या बदलापूरनजीक असलेला कोंडेश्वर  धबधबा हा मुंबईजवळील प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक  आनंद लुटतात. मात्र काही उत्साही पर्यटक या धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. या मंदिराच्या मागे मोठमोठे कुंड आहेत, ते पाण्याखाली गेले की पर्यटकांना या कुंडांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा त्याकुंडात अडकून अनेक तरुणांनाचा जीव गेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जाताना प्रत्येक पर्यटकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 


सह्याद्री पर्वतांच्या रांगेत  हिरवीगार मखमल पांघरलेला हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला बदलापूर शहरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरांवर कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.  मात्र पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना संपत आलाय तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात थोडाफार पाऊस येऊन गेला आहे.  याच पावसांमुळे कोंडेश्वर धबधबा काही प्रमाणात वाहताना दिसत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे  पावसाने जरी दडी मारली असली तरीही निसर्गाच्या कुशीत आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात याठिकाणी येऊन आनंद लुटताना दिसतात. 


कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जुलै महिन्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.  त्यातच  पावसाचा जोर वाढला की कोंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेले मंदिर आणि कुंड पाण्याखाली जातात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार दरवर्षी नोटीस काढत पर्यटकांना या धबधब्याजवळ येण्यास मनाई करते. मात्र काही उत्साही पर्यटक या धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. आतापर्यत गेल्या पाच ते सहा वर्षात या ठिकाणच्या परिसरात  ७० हुन अधिक तरुण तरुणीचे जीव गेले आहेत.


शिवाय  या मंदिराच्या मागे मोठमोठे कुंड आहेत ते पाण्याखाली गेले की पर्यटकांना या कुंडांतील खोल पाण्याचा  अंदाज येत नसल्याने अनेकवेळा त्याकुंडात अडकून अनेक तरुणांनाचा जीव गेला आहे.  त्यामुळे बदलापूरच्या कोंडेश्वर आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांचा आनंद लुटायचा असेल तर स्वतः च्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन दरवर्षी मंदिर व्यवस्थापन समिती तर्फे व स्थानिक पोलीस प्रशासनकडून करण्यात येते. या धबधब्याच्या शेजारीच महादेवाचे प्राचीन शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देखील अशा प्रकारची बंदी घातली जाते की नाही याची उत्सुकता पर्यटकांना लागून राहिली आहे.