Kalyan building news: कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरातील श्री सप्तश्रृंगी ही इमारत मंगळवारी दुपारी कोसळली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश होता. नमस्वी शेलार असे या मृत मुलीचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या (Fire birgade) जवानांनी इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर येथील उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
श्री सप्तश्रृंगी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर श्रीकांत शेलार पत्नी, दोन वर्षाची मुलगी नमस्वी आणि मुलगा श्रावील यांच्याबरोबर राहत होते. मंगळवारी दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळला तेव्हा चौघेही घरातच होते. नमस्वी आणि श्रावील हे दोघे बहीण- भाऊ हॉलमध्ये खेळत होते. इमारत कोसळल्यानंतर मुलांना वाचविण्यासाठी आई वडिलांनी मलब्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र, समोरच्या ढिगाऱ्यात त्यांना काहीच दिसले नाही. नमस्वी आणि श्रावील दोघेही ढिगाऱ्याच्या बऱ्याच आत गाडले होते. श्रीकांत शेलार आणि त्यांच्या पत्नीने मुलांना शोधण्या प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी या दोघांना कसेबसे रोखत बाहेर काढले. मात्र, मलब्यातून कोणाला बाहेर काढले जाते हेच कळत नसल्याने ते हवालदिल झाले होते. पोलिसांनीही त्या दोघांना रोखून धरले होते.
अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीवेळ ढिगारा उपसल्यानंतर श्रावील त्यांच्या हाती लागला. त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काहीवेळाने अग्निशमन दलाने चिमुकल्या मनस्वीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला. तेव्हा श्रीकांत शेलार आणि त्यांच्या पत्नीने मृतदेहाकडे धाव घेत एकच टाहो फोडला. या दोघांचा आक्रोश पाहून घटनास्थळी अनेकांचे काळीज हेलावून गेले.
Kalyan news: आई, आजी गेल्याचे मुलीला कसं सांगू? निलंचर साहू भावूक
सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत निलंचर साहू यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा निलंचर साहू हे कामावर गेले होते. घरात त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू आणि मेहुणी सुजाता पाडी आणि मुलगी होते. स्लॅब कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन सुनीता साहू, सासू प्रमिला साहू आणि सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. तर निलंचर साहू यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या आई आणि आजीचा मृत्यू झाल्याचे मुलीला माहिती नाही. तिला आता मी ही गोष्ट कशी सांगू, असा प्रश्न आता निलंचर साहू यांना पडला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच निलंचर साहू कामावरुन धावतपळत घरी आले. मात्र, तोपर्यंत सगळं काही संपलं होतं.
Building Collapse: कल्याण इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे
प्रमिला साहू (वय 58)नामस्वी शेलार (वय दीड वर्षे)सुनीता साहू (वय 37) सुजाता पाडी (वय 32)सुशीला गुजर (वय 78)व्यंकट चव्हाण (वय 42)
जखमींची नावे
अरुणा रोहिदास गिरणारायन (वय 48)शरवील श्रीकांत शेलार (वय 4)विनायक मनोज पाधी (वय साडेचार वर्षे)
आणखी वाचा
'मम्मी गेली...' खिडकीतून चिमुरडीचा आक्रोश, कल्याण इमारत दुर्घटनेतील काळीज हेलावणारा प्रसंग