कल्याण हादरलं! भरधाव ट्रकची दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू
कल्याणच्या निक्कीनगर परिसरात भीषण अपघात (Accident) झाला आहे. आपल्या मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली
Kalyan Accident : कल्याणमध्ये (Kalyan) धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या निक्कीनगर परिसरात भीषण अपघात (Accident) झाला आहे. आपल्या मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात घडण्याची विविध कारणे आहेत. गाड्यांचा वेग, मद्यपान, रस्त्यांची अवस्था अशी विविध कारणांनी अपघात घडतात.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai Accident : सह्याद्री अतिथीगृहासमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, बस अन् कारच्या मध्ये चिरडून महिलेचा मृत्यू, भयानक दृश्य पाहून सगळेच हादरले
Before You Go
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही






















