Jitendra Awhad News :  आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेलाची बचत करा आणि अनावश्यक परदेश दौरे पुढे ढकला, असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 

Continues below advertisement

आयुक्त आणि महापौर उपमहापौर यांनी परिवहनचा प्रवास करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पेट्रोल वापर कमी करण्याच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा करा. सत्ताधाऱ्यांनी आता टीएमटी बसचा वापर करावा अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून शऱद पवार गटाने टोला लगावला आहे. आव्हाड यांनी घोड्यावर बसून ठाणे महानगरपालिकेत एन्ट्री केल्याचं पाहायला मिळालं. आयुक्त आणि महापौर उपमहापौर यांनी परिवहनचा प्रवास करावा असं आवाहन आव्हाड यांनी केलं. अंबानी आणि अदानी यांचा ताफा कमी होणार आहे का? असा सवाल देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते गाडीमधनं फिरणं बंद करणार आहेत का? असा सवालही आव्हाड यांनी केला. या सोन्याच्या बाजारात अदानी आणि अंबानी यांना यायचं त्यासाठी मोदींनी बॉल फेकला आहे असंही आव्हाड म्हणाले.

जिथे शक्य असेल तिथे Work From Home चा पर्याय स्वीकारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडील भाषणात इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि जिथे शक्य असेल तिथे Work From Home चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्यामागचा उद्देश वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा इंधन आयात खर्च आणि विदेशी चलनावरील दबाव कमी करणे हा आहे.

Continues below advertisement

नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून केलेली नऊ आवाहने

1  पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत2  खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा3  पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका4  वर्षभर परदेशी प्रवास टाळा5  कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे6  परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही7  जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा8  वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या9  परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा

महत्वाच्या बातम्या:

पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार