Gas Shortage Thane: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरला (Gas Cylinder) लागणारा वायू पुरवठा बंद केल्याने बाजारात या सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल चालकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाण्यात व्यावसायिक वापराच्या एलपीजीचा काळा बाजार सुरु झाला आहे. त्यामुळे एरवी 1800 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर ब्लॅकमध्ये तब्बल 4000 ते 4500 रुपयांना विकला जात आहे. यामुळे ठाण्यातील 80 टक्क्याहून अधिक हॉटेल्स आणि सोमवारनंतर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर ठाण्यातील पाईपच्या माध्यमातून होणाऱ्या गॅसचा पुरवठाही 30 टक्के एवढाच होत आहे. याचा फटका मोठ्या हॉटेल्सना बसताना दिसत आहे. हॉटेल्स बंद पडत असल्यामुळे ठाण्यात एकटे राहत असणाऱ्या बॅचलर्सच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Latest News)

या पार्श्वभूमीवर काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी काही गोदामांवर छापा मारला आहे. गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हॉटेल असोसिएशनकडून करण्यात आली आहे. चूल पेटवली तर धूर होणार,  प्रदूषण होणार त्यावरती देखील महापालिका कारवाई करत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण होत आहे. 

Jalna news: दहा दिवसांत स्टीलच्या भावात 5 हजारांची वाढ

इराण-इस्रायल युद्धामुळे गेल्या दहा दिवसांत स्टीलच्या भावात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी 56500 रुपये प्रतिटन असलेले स्टीलचे दर 61500 प्रति टनावर जाऊन पोहोचले आहेत. स्टीलचा भाव वाढल्याने बांधकामाचे दर वाढण्याची शक्यता आहे. आखाती देशातून येणारे स्क्रॅप तसेच स्टील बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या प्रोसेससाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने कच्च्या मालाची उपलब्धता कमी झाल्याने हे दर वाढले आहेत.

Raigad News: रायगड, चिपळूणमध्ये गॅसचा तुटवडा

युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र इंधन तुटवडा सुरू असल्यानं एलपीजी इंधन साठा कमी प्रमाणात होत चालल्याने रायगडच्या कर्जतमध्ये नागरिकांनी भारत गॅस वितरण केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळणार की नाही, या भीतीपोटी अनेक नागरिक सिलेंडरच्या टाक्या घेऊन केंद्रावर रांगेत उभे राहिले आहेतय अचानक वाढलेल्या गर्दीमुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर चिपळूणमध्ये व्यावसायिक गॅस तुटवडा जाणवू लागला आहे. दुपारपर्यंत पुरेल इतका गॅस शिल्लक असताना हॉटेल व्यावसायिक ना नवा सिलेंडर मिळण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा

गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...