Dombivli News : डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्याएकता सावंत (Ekta Sawant) यामराठीव्यवसायिकेवर पालिकेकडूनकारवाईकरण्यातआलीय. मात्र माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा हि कारवाई केलीय. शिवाय पालिकेकडून फक्त माझ्याच स्टॉलवर कारवाई केली जात असून इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे (KDMC) अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा केला होता. एकता सावंत यारिलस्टार असूनत्यांच्यारिल्सलामिलियनमध्ये व्हिव्हमिळतात. तरत्यांचे लाखापेक्षा अधिक फॉलोवर आहे.
दरम्यन, पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात सावंत यांनी नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली. त्यांनतर या इंस्टाग्राम पोस्टची दखल थेट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे डोंबिवलीत दाखल झाले असून आपण एकता सावंत यांच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिलीय. तर एकता सावंत यांच्या बाबत घडलेल्या प्रकारानंतर अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहे. (MNS Avinash Jadhav visits Dombivli)
Ekta Sawant : 'मला राजसाहेबांचा फोटो असलेली एक टपरी द्या मग मला...'
'दादा मला येथे टपरी टाकून द्या आणि त्या टपरीवर राज साहेबांचा फोटो टाकून द्या. मी राजसाहेबांना मनातून वोट करते, तर त्यांचा फोटो गाडीवर पाहिजे. मग मला कोणीच येथून हटवू शकत नाही, अशीभावना एकता सावंत यांनीमनसेनेतेअविनाशजाधवांशीबोलतानाव्यक्तकेली. तरयावरउत्तरदेतांनाअविनाश जाधव म्हणालेकि, मला राज साहेबांनीच (Raj Thackeray) तुला भेटायला पाठवलेआहे. तुझा काय प्रॉब्लेम झाला आहे तेआपण पाहून घेऊ. असाविश्वासअविनाश जाधव यांनीयावेळीव्यक्तकेलाय.
Avinash Jadhav visits Dombivli : मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ
डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. असा दावा करण्यात येत आहे. तर महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होताना दिसून आली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे.
