Dombivli Fire: डोंबिवली पूर्वेतील चेडा नगर परिसरात पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे 4.15 वाजता अचानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण 29 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.
आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते.
Dombivli Fire: बेसमेंटमधील दुचाकींचे मोठे नुकसान
घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
Dombivli Fire: परिसरात भीतीचे वातावरण
शॉर्ट सर्किट की इतर कोणती तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Mulund Accident : मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना, ५ जणांना अटक
दरम्यान, मुलुंड येथे मेट्रो प्रकल्पातील स्लॅब कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिलन रोड बिल्डटेक (रिलायन्स अस्तलदी कंपनी) या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवधूत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहेया घटनेचा मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
