ठाणे :डोंबिवलीतील (Dombivali) एका मराठमोळ्या तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला, स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या तरुणीच्या व्हिडिओची दखल घेत ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना हा विषय सोडवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, अविनाश जाधव यांनी तरुणीची भेट घेऊन तिची बाजू समजून घेतली, तसेच तिला स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी पाठबळही दिलं. त्यानंतर, शॉरमा विकणारी ही तरुणी आणखी व्हायरल (Viral) झाली असून पत्रकारांनीही तिच्याभोवती गराडा घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पत्रकार तिला प्रश्न विचारत असतानाच तरुणीच्या पाठिमागे जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी, पत्रकारांनाही वाद घातल्याची घटना घडली. 

Continues below advertisement

डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डोंबिवलीत एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र, केडीएमसी पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा या मराठी तरुणीने केला होता. या संदर्भात तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली असता या इंस्टाग्राम पोस्टची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. तर, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. त्यानंतर, तरुणी एकता पत्रकारांशी संवाद साधत असताना पोलिसांनी संबंधित परसिरात लाठीचार्ज केला. घटनास्थळी जमाव पांगविण्यासाठी त्यांनी तरुणीच्या जवळ उभे असलेल्या लोकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान, तरुणी प्रसिद्धीसाठी हे करते असे बोलत पोलिसांनी पत्रकारांशीही वाद घातला.

मनसे तरुणीच्या पाठिशी

डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाले आहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होताना दिसून आली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

Continues below advertisement

300 रुपये हफ्ता घेऊन कारवाई

डोंबिवलीतील एकता सावंत ही तरुणी रीलस्टार असून तिचे इंस्टाग्रामवर 5 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असल्याने तिचे व्हिडिओ मिलियन्समध्ये पाहिले जातात. एकता ही शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती. इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत आहे. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असे म्हणत या तरुणीने खंत मांडल्यानंतर अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले होते. 

एकताच्या पाठीशी शिवसेना 

दरम्यान, एकता सावंत या तरुणीशी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी संवाद साधला असून तिच्या पाठी संपूर्ण शिवसेना आहे, असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी दुजाभाव करत असतील तर खपवून घेणार नाही, असा इशाराच आमदार राजेश मोरे यांनी दिला आहे. 

हेही वाचा