एक्स्प्लोर

नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार

पीडित रुग्ण महिलेची आई साधना कारंडे यांनी आप बिती सांगताना म्हटले की, माझी मोठी मुलगी गरोदर होती. सोनोग्राफी आणि इतर सर्व तपासण्या केल्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो.

ठाणे : डोंबिवलीतील (Dombivali) एका खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून 'माझा फोन का उचलला नाही?' या क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना (Doctor) मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णालयातील हा सर्व थरार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, रुग्णालयातील पीडित रुग्ण महिलेच्या आईनेही आपली आपबिती सांगितली. 

पीडित रुग्ण महिलेची आई साधना कारंडे यांनी आप बिती सांगताना म्हटले की, माझी मोठी मुलगी गरोदर होती. सोनोग्राफी आणि इतर सर्व तपासण्या केल्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो. आम्ही डॉक्टरांना, पावसामुळे उद्धभलेली ही आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगितले, पण त्यांनी उपचार करण्यास नकार दिला आणि तिला सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही डॉक्टरांना विनंती केली की रस्त्यांवर पाणी साचले आहे, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला अनेक तास लागतील. माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचे सांगून तिची प्रसूती तिथेच करण्याची वारंवार विनंती केली. आम्ही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या, पण त्यांनी नकार देत तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे, आम्ही नगरसेवकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. 

माझ्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अशा परिस्थितीत काय करावे हे आम्हाला सुचत नव्हते. म्हणून आम्ही दादांना फोन केला. अशा अवस्थेत तिला दुसऱ्या रुग्णालयात कसे हलवायचे, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. रुग्णाची इतकी गंभीर अवस्था असतानाही रुग्णालय उपचार का नाकारत आहे, याचसंदर्भाने जाब नगरसेवकांनी विचारल्याचं पीडित रुग्णाच्या आईने म्हटलं. 

खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

नगरसेवकाकडून दिलगिरी व्यक्त

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. जी मारहाण झाली याचा दिलगिरी व्यक्त करतो, मी ठासून सांगतो मी महिला डॉक्टरांवरती हात उचलला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसते ते कॅमेरा अँगलने येत असेल, मी तिला ती बोलतो कारण ती माझ्या मुलीसारखी आहे तिचं लग्न झालंय की नाही हे देखील मला माहिती नाही. आम्ही बोलत असताना सतत कानाला फोन लावून ती बोलत होती, आमची तक्रार ऐकत नव्हती म्हणून मी हातावर फटका मारला, असे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आम्ही महिलांवरती हात उचलला नाही आणि यापुढेही उचलणार नाही, जी घटना घडली आहे ती आस्थापनाच्या कमतरतेमुळे आणि ती व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू, यांनी मला बोलवलं त्या लोकांनी माझा फोन घेतला नाही, घटनेचा गंभीरता ओळखून मी त्या ठिकाणी गेलो, असेही रमेश म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा

पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Mumbai Crime : मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एका प्रवाशावर धारदार कोयता उगारला, ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरील घटना
मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एका प्रवाशावर धारदार कोयता उगारला, ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरील घटना
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! शिवसेना नगरससेवक रमेश म्हात्रेला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! शिवसेना नगरससेवक रमेश म्हात्रेला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget