एक्स्प्लोर

Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?

Bhiwandi Mahangarpalika Mayor Election 2026: भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकं प्रकरण काय? भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेसच्या गटात

Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे . महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 30,भाजपा 22, राष्ट्रवादी 12 शिवसेना 12 समाजवादी 6 कोणार्क विकास आघाडी 4 भिवंडी विकास आघाडी 3  अपक्ष 1 असे संख्याबळ आहे.  महापौर निवडणुकीसाठी  भाजपा शिवसेना आणि काँग्रेस प्रयत्न करत होते. परंतु महायुतीमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेने कोणार्क विकास आघाडी (Konark Vikas Aghadi) भिवंडी विकास आघाडी व समाजवादी यांना एकत्रित करत 26 चा आकडा जमा केला. परंतु विलास पाटील आणि भाजपमध्ये झालेल्या वादांगा नंतर शिवसेना विलास पाटील यांना जवळ करत आहे. त्यामुळे भाजपा मदत करण्यास तयार नव्हती. (Bhiwandi News)

आता भाजपामध्ये देखील दोन गट पडले आहेत. नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांनी भाजपामधून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने नारायण चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सुमित पाटील यांचा गट नाराज होता. परंतु त्यांची नाराजी पक्षाने दूर केली आणिनारायण चौधरी व स्नेहा पाटील यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु ऐनवेळेस भाजपने महापौर उमेदवार नारायण चौधरी यांना बदली करून स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा भिवंडी शहर अध्यक्ष रवी सावंत यांनी एका पत्राद्वारे केली. यानंतर भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला होता. 

या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले व त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचे निर्णय घेतला. तसेच भाजपचा नऊ नगरसेवकांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीलादेखील गेला होता. काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता येतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे. ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर साठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर मतदान झाले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Bhiwandi News: भिवंडीत भाजपच्या 9 नगरसेवकांची काँग्रेसच्या गटात नोंदणी, राजकारणात मोठा उलटफेर

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत एखाद्या पक्षाने गट किंवा आघाडी स्थापन केली असली तरी तो गट फुटू शकतो. मात्र, अशावेळी पक्षाच्या व्हीप किंवा पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवक अपात्र ठरू शकतो आणि त्याची सदस्यता तसेच मिळालेले पदही जाऊ शकते. याबाबत तक्रार आल्यास विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कार्यवाही होऊ शकते. याशिवाय संबंधित पक्ष आपल्या सदस्यांवर निलंबन किंवा हकालपट्टीसारखी पक्षांतर्गत कारवाईही करू शकतो.

भिवंडीतील भाजपातून बाहेर पडून काँग्रेससोबत येणारे नगरसेवक थोड्याच वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे भेट घेणार आहेत. ताज्या माहितीनुसार, भिवंडीतील भाजपच्या नगरसेवकांनी  काँग्रेसच्या गटामध्ये नोंदणी केली आहे. पण ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत का, की केवळ पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा

भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Commercial LPG Crisis : गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
Kalyan : दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget