धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं बदलापूर हादरलं, एका महिला आणि ओला चालकाला संपवलं, परिसरात खळबळ
बदलापूरच्या जुवेलीगाव परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना या परिसरात घडली आहे.
Badlpaur crime News : बदलापूरच्या जुवेलीगाव परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना या परिसरात घडली आहे. एक महिला आणि ओला चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. महिलेचं नाव मनिषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सांगलीत घरात घुसून एका हमाल नेत्याच्या 13 वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून निर्घुण पणे केली हत्या करण्यात आली आहे.
आपल्या आईला ओला चालकाने मारलं, तीन वर्षाच्या मुलाचा जबाब
दुहेरी हत्याकांडाने बदलापूर हादरलय. बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात एका महिलेची आणि पुरुषाची धारदार शस्त्राने हत्या झाली आहे. महिला आणि पुरुष ओला कारने बदलापुरात आले होते. महिलेचं नाव मनिषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आईला ओला चालकाने मारलं असा जबाब तीन वर्षाच्या लहान मुलानं दिला आहे. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे याची हत्या कुणी कोणी? याचा तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण बदलापूर शहर हादरून गेलं आहे.
रक्तरंजित राड्यान सांगली हादरली
रक्तरंजित राड्यान सांगली हादरलीय. घरात घुसून हमाल नेत्याच्या तेरा वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी हे कृत्य केलं आहे. वेदांत मारुती बंडगर वय 13 असे मृत मुलाचे नाव आहे. सांगलीतील संजयनगर परिसरातील एसटी कॉलनीत ही गोळीबाराची घटना घडली. माथाडी कामगार वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह मोठा फौज फाटा तयार आहे.
बदलापूर शहरात कोयता गँगचा धोका
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत भरवस्तीत असलेल्या एका सोसायटीमध्ये हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या संशयितांनी चोरी किंवा गंभीर गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयित इसम हातात कोयता घेऊन एका निवासी सोसायटीच्या परिसरात फिरताना आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे बदलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात याआधीही कोयता गँगच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशा घटना वारंवार घडत असताना पोलिसांच्या गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Before You Go
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया





















