एक्स्प्लोर

Ambernath BJP vs Shiv Sena: 'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?

Ambernath BJP vs Shiv Sena: अंबरनाथ नगरपालिकेत घनकचरा आणि प्रशासकीय विषयांवरील सभा एप्रिल महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यानंतर आज या दोन्ही विषयांवर सभा पार पडली.

Ambernath BJP vs Shiv Sena: अंबरनाथ नगरपालिकेत (Ambernath Municipal Council) भाजप (BJP) आणि शिवसेनेची (Shiv Sena) युती झाल्यानंतरही दोन्ही पक्षांमधील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पालिकेच्या विशेष सभेत (Special Meeting) आरोग्य अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेनेने नगराध्यक्षांच्या अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित केला, तर नगराध्यक्षांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेला थेट इशारा दिला. “नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती अंबरनाथमध्ये होईल,” असा इशारा भाजपकडून देण्यात आला.

Ambernath BJP vs Shiv Sena:  एप्रिलपासून रखडलेल्या सभा आज पार पडल्या

अंबरनाथ नगरपालिकेत घनकचरा आणि प्रशासकीय विषयांवरील सभा एप्रिल महिन्यापासून रखडल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली. या युतीनंतर आज घनकचरा आणि प्रशासकीय विषयांवर सभा पार पडली. मात्र, या सभेत आरोग्य अधिकाऱ्यांवरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. “अधिकारी नगराध्यक्षांचं ऐकत कसं नाहीत?” असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद चांगलाच रंगला.

Ambernath BJP vs Shiv Sena: नगराध्यक्षांना टार्गेट करत असाल तर...

शिवसेनेकडून नगराध्यक्षांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरून टीका सुरू असताना भाजपच्या नेत्यांचा पारा चढला. “नगराध्यक्षांना टार्गेट करत असाल तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसारखी परिस्थिती अंबरनाथ पालिकेत होईल,” असा थेट इशारा भाजपने शिवसेनेला दिला.

Ambernath BJP vs Shiv Sena: डिसेंबरच्या निवडणुकीनंतर बदललेलं राजकीय गणित

डिसेंबर महिन्यात अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. संख्याबळाच्या दृष्टीने नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती अपेक्षित होती. मात्र, सुरुवातीला भाजपने विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे भाजपवर टीकाही झाली. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार भाजप आणि शिवसेनेची युती झाली. मात्र, ही युती केवळ वरिष्ठांच्या आदेशाने झाली असून, स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांमधील संघर्ष अद्याप कायम असल्याचे पालिकेतील घडामोडींवरून दिसत आहे.

Ambernath BJP vs Shiv Sena: 15 मिनिटे भाजप-शिवसेना आमनेसामने

युतीमुळे एप्रिल महिन्यात घनकचरा आणि आरोग्य विषयांवरील सभा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज या सभा पार पडल्या. मात्र, सभेत पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेकडून नगराध्यक्षांना टार्गेट करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याला शिवसेनेचा एक नगरसेवक जबाबदार ठरू शकतो, असा इशाराही भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे. तब्बल 15 मिनिटे पालिकेच्या सभेत भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी सुरू होती. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर युती झाली असली, तरी अंबरनाथमधील स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष कायम असल्याचे या विशेष सभेतील वादावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: 'महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार', छगन भुजबळांचा घरचा आहेर; थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Adivasi Students Ulgulan Morcha: आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला; पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा दावा, धक्काबुक्कीचाही आरोप
आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला; पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा दावा, धक्काबुक्कीचाही आरोप
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील चक्रावणारी थिअरी, गोळी रिव्हर्स होऊन टल्ली कनोजियाला लागली? संशय येताच पोलिसांच्या वेगवान हालचाली
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील चक्रावणारी थिअरी, गोळी रिव्हर्स होऊन टल्ली कनोजियाला लागली? संशय येताच पोलिसांच्या वेगवान हालचाली
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget