ठाणे : दर रविवारी 'एबीपी माझा'वर 'आनंदाचे पान' या पुस्तकांशी संबंधित विशेष कार्यक्रमाचे नियोजन, लेखकांशी संवाद आणि सूत्रसंचालन करणाऱ्या वरिष्ठ पत्रकार आणि 'एबीपी माझा'च्या असोसिएट एडिटर भारती सहस्रबुद्धे यांना 'ठाणे गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 44 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Continues below advertisement

खासदार नरेश म्हस्के आणि ठाण्याच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते भारती सहस्रबुद्धे यांना हा सन्मान देण्यात आला. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण ठाणेकरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'आनंदाचे पान' कार्यक्रमातून साहित्याची सेवा

भारती सहस्रबुद्धे या गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. एबीपी माझावर दर रविवारी प्रसारित होणाऱ्या 'आनंदाचे पान' या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आणि ती घरोघरी पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे.

Continues below advertisement

पुस्तकांची समीक्षा, नवोदित आणि ज्येष्ठ लेखकांशी प्रत्यक्ष संवाद आणि ओघवते सूत्रसंचालन यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रभरातील वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या याच योगदानाची दखल घेत ठाणे महापालिकेने त्यांना 'ठाणे गौरव' पुरस्काराने गौरवले आहे.

ठाणे पालिकेचा 44 वा वर्धापन दिन उत्साहात

1 ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता महापालिका भवन येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ठाण्याच्या विकासात आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान!

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, साहित्य, उद्योग आणि समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना 'ठाणे भूषण', 'ठाणे गौरव' आणि 'ठाणे गुणीजन' पुरस्कार दिले जातात. तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना विशेष क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते.

यंदाच्या सोहळ्यात एबीपी माझाच्या असोसिएट एडिटर भारती सहस्रबुद्धे यांच्यासह ठाण्यातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आले.

ही बातमी वाचा: